दहावी परीक्षेत मोठा बदल! आता पास होणे झाले सोपे; विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण.10th Borad Exam Update

10th Borad Exam Update:विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणारी दहावीची बोर्डाची परीक्षा यावर्षी २० फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. परंतु ही परीक्षा सुरु होण्याआधी सर्व विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून एक आनंदाची बातमी मिळाली आहे. म्हणजेच एखाद्या विषयात १५ ते २० गुण मिळाले तरी आता विद्यार्थी पास होऊ शकतात. नेमका काय नियम आहे तो आता आपण जाणून घेऊयात.

मागील मूल्यमापनाच्या नियमानुसार एखाद्या विद्यार्थ्याला शाळेतील अंतर्गत मूल्यमापनात जरी २० पैकी वीस गुण मिळाले आणि लेखी परीक्षेत १५ गुण मिळाले तरी असे एकूण ३५ गुण मिळाले असले तरी तो विद्यार्थी उत्तीर्ण होत नव्हता. त्याला लेखी परीक्षेत २५% गुण मिळवणे बंधनकारक होते. परंतु हा नियम आता बदलण्यात आला असून एखाद्या विद्यार्थ्याला अंतर्गत मूल्यमापन आणि लेखी परीक्षा मिळून ३५ गुण मिळाले तरी तो पास होणार आहे. म्हणजे ८० पैकी १५ गुण जरी त्याला लेखी परीक्षेत मिळाले आणि तोंडी परीक्षेत २० गुण असे एकूण ३५ गुण असतील तर तो पास होणार आहे.

दादांची आठवण उडत उडत पायाजवळ आली’, बारामतीच्या सुनेनं शूट केला VIDEO, 70 लाख लोकांनी पाहिला Ajit Pawar Plane Crash News

तोंडी परीक्षेत २० गुण मिळतात. त्यामुळे आता लेखी परीक्षेत पाच गुण मिळाले तरी विद्यार्थी पास होऊ शकतो.

त्रिभाषा सूत्रानुसार दहावीमध्ये पास होणे आता सोप्पे:

मराठी – हिंदी आणि इंग्रजी असे तीन विषय मिळून जरी एखाद्या विद्यार्थ्याला १०५ गुण मिळाले तरी तो आता पास होणार आहे. परंतु किमान एका विषयात त्याला २५ पैकी जास्त गुण मिळायला हवे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला इंग्रजी मध्ये २५ गुण असतील, मराठीमध्ये ४० आणि हिंदी मध्ये ४० अशी या तीन विषयांची एकूण बेरीज १०५ होत असेल तर तो विद्यार्थी मराठी आणि हिंदी विषयासोबत इंग्रजी मध्ये सुद्धा पास असेल.

गणित आणि विज्ञानचा फोर्मुला

गणित आणि विज्ञान या दोन विषयांची मिळून एखाद्या विद्यार्थ्याला ७० गुण मिळाले असले तरी तो विद्यार्थी या दोन्ही विषयात पास असेल. यासाठी त्याला किमान एका विषयात २५ पेक्षा अधिक गुण मिळवणे बंधनकारक असेल.

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment