State Employees Pension:गणेशोत्सवाच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना महायुती सरकारने मोठी आनंदवार्ता दिली आहे.
राज्य कर्मचारी व निवृत्तीचे वय – संक्षिप्त आढावा
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
या निर्णयाचा फायदा राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी आणि निवृत्त पेन्शनधारकांनाही मिळणार आहे.
शासन निर्णय GR येथे पहा
सरकारी कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन/पेन्शन दि. 26 ऑगस्ट पूर्वी ; वित्त विभाग GR निर्गमित दि.21.08.2025
यंदाच्या गणेशोत्सवाची सुरुवात लवकर होत असल्याने महाराष्ट्र शासनाने कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. वित्त विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, ऑगस्ट महिन्याचा पगार आणि पेन्शन गणेशोत्सवाच्या आधीच दिला जाणार आहे, जेणेकरून सणासुदीच्या काळात कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये.
कधी मिळणार पगार?
सामान्यतः ऑगस्ट महिन्याचा पगार १ सप्टेंबरला खात्यात जमा होतो. मात्र, यंदा शासनाने विशेष निर्णय घेतला असून २६ ऑगस्ट २०२५ रोजीच कर्मचाऱ्यांना पगार मिळणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे.
कोणाला होणार फायदा?
हा निर्णय केवळ राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठीच नाही, तर निवृत्तीवेतनधारक (पेन्शनर्स) आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनाही लागू होईल. तसेच जिल्हा परिषद, अनुदानित शैक्षणिक संस्था, कृषी व बिगर-कृषी विद्यापीठांमधील अधिकारी, कर्मचारी आणि पेन्शनधारकांनाही याचा लाभ मिळणार आहे.
गणेशोत्सव आनंदात साजरा होणार
यंदा गणेशोत्सवाची सुरुवात २७ ऑगस्ट २०२५ पासून होत आहे. त्यामुळे सर्व कर्मचारी व पेन्शनधारकांना सणासुदीच्या तयारीसाठी वेळेवर आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. संबंधित विभागांना पगार वेळेवर जमा होईल याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा गणेशोत्सव अधिक उत्साहात आणि आनंदात साजरा होणार आहे.