आनंदाची बातमी..! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ५५ कोटींचा पीक विमा जमा होणार, पहा तुमचे नाव Crop Insurence List

Crop Insurence List गेले अनेक महिने प्रतीक्षेत असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. खरीप हंगाम २०२४ साठी मंजूर झालेला प्रलंबित पीक विमा आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.

५५ कोटींच्या निधीला अखेर मुहूर्त Crop Insurence List

खरीप हंगाम २०२४ साठी धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी एकूण ५५ कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला होता. परंतु, तांत्रिक अडचणींमुळे ही रक्कम वेळेवर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकली नव्हती.

प्रशासनाकडून वारंवार आश्वासने देऊनही वाटप रखडले होते. मात्र, आता सर्व तांत्रिक अडथळे दूर करण्यात आले असून, ३ सप्टेंबर २०२५ पासून प्रत्यक्ष रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

GST परिषदेच्या निर्णयानंतर सोन्याच्या किमतीत मोठा उलटफेर; झपाट्याने बदलले दर, जाणून घ्या १० ग्रॅम सोन्याची किंमत Gold-Silver Price Today News 2025

सोलापूर आणि वाशिमनंतर आता धाराशिवला दिलासा

यापूर्वी सोलापूर आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप २०२४ चा विमा मिळाला होता. आता त्याचप्रमाणे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचीही प्रतीक्षा संपली आहे. या जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामाचा विमा आधीच वितरित करण्यात आला होता, पण खरीप हंगामाची मोठी रक्कम प्रलंबित होती. ५५ कोटी रुपयांचा निधी मिळायला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

HDFC BANK loan 2025:HDFC कडून देत आहे 5 लाख रुपयेचे कर्ज असा अर्ज करा

इतर जिल्ह्यांसाठी प्रतीक्षा कायम

धाराशिव जिल्ह्यात सुरू झालेली ही प्रक्रिया इतर जिल्ह्यांसाठीही एक सकारात्मक संकेत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील शेतकरी अजूनही खरीप २०२४ आणि रब्बी २०२४ च्या विम्याची वाट पाहत आहेत. शासन आणि विमा कंपन्या स्तरावर या कामाला गती दिली जात असून, लवकरच उर्वरित सर्व पात्र शेतकऱ्यांनाही त्यांच्या हक्काचा विमा मिळेल अशी अपेक्षा आहे.

शेतकऱ्यांनी अधिकृत माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील कृषी कार्यालयाशी किंवा विमा कंपनीच्या संकेतस्थळाशी संपर्क साधावा.

बापरे एवढी हिंमतच कशी होते? बसमध्ये शेजारी बसलेल्या मुलीसोबत वडिलांच्या वयाच्या व्यक्तीचं धक्कादायक कृत्य; VIDEO व्हायरल.Bus Ledies Viral Video

Leave a Comment