State employee officer salary cut 2025:राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत म्हणून राज्यातील सर्व भा.प्र.से., मा.पो.से., भा.व.से व महाराष्ट्र राज्य शासनाचे सर्व अधिकारी/कर्मचारी यांच्या माहे ऑक्टोबर, २०२५ च्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणगी म्हणून उपलब्ध करुन देण्याबाबत…
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीत, आपत्तीग्रस्त नागरीकांच्या मदतीसाठी राज्य शासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ आणि राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र महासंघाशी संलग्न सर्व विभागातील अधिकारी आणि कर्मचारी देखील कर्तव्यभावनेने एक दिवसाचे वेतन या मदतकार्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्यास इच्छुक असल्याबाबत त्यांच्या दि. २४ सप्टेंबर, २०२५ आणि २८ सप्टेंबर, २०२५ रोजीच्या पत्रान्वये शासनाला कळविले आहे. राज्य शासनाच्या वतीने सुरु असलेल्या सदर मदतकार्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून अधिक रक्कम देता यावी यास्तव राज्यातील सर्व भा.प्र.से., भा.पो.से., भा.व.से व राज्य शासनाचे सर्व अधिकारी/कर्मचारी यांच्याकडून एक दिवसाचे एकूण वेतनाइतकी रक्कम माहे ऑक्टोबर, २०२५ च्या वेतनातून वसूल करण्यात यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
परिपत्रक –
अतिवृष्टीमुळे आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीकरीता राज्य शासनाकडूनही मदत कार्यासाठी पुढाकार घेण्यात आला असून या नैसर्गिक आपत्तीस सामोरे जाण्यासाठी सहाय्य व मदत व पुनर्वसनाच्या कामास आपलाही हातभार लागावा म्हणून राज्यातील सर्व भा.प्र.से.. भा.पो.से., भा.व.से व राज्य शासनाचे सर्व अधिकारी/कर्मचारी यांचा सहभाग असावा या कर्तव्यबुध्दीने त्यांना माहे ऑक्टोबर, २०२५ च्या आपल्या वेतनातील प्रत्येकी १ दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.
२. राज्य शासनातील सर्व मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका/नगरपरिषद, सार्वजनिक उपक्रमे, महामंडळे, मंडळे तसेच सर्व स्वायत्त संस्थेचे विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख यांनी सदर परिपत्रक आपल्या विभागातील/कार्यालयातील सर्व अधिकारी/कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून द्यावे व त्यांना याबाबत समजावून सांगावे. तसेच एक दिवसाच्या वेतन कपातीस त्यांची अनुमती यासोबतच्या विहित अनुमतीपत्रात स्वाक्षांकित करुन आपल्या विभागातील/कार्यालयातील रोख कार्यासन वा रोखपाल यांचेकडे सुपूर्द करण्यासाठी त्यांना सूचित करावे.
३. अधिकारी यांच्या पगारातून एक दिवसाचे वेतन (माहे ऑक्टोबर, २०२५) कपातीसाठी व ती रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्यासाठी व त्याचा हिशोब सादर करण्यासाठी खालील कार्यपध्दतीचा अवलंब करण्यात यावा:-
(एक) माहे ऑक्टोबर, २०२५ या महिन्याचे वेतन देयके संपूर्ण रकमेचे काढण्यात यावे. तथापि, वेतनातील नियमित वजातीनंतर व एक दिवसाच्या वेतनाच्या वजातीनंतर वेतनाची उर्वरीत रक्कम संबंधित अधिकारी यांना धनादेश/रोखीने / विहित पध्दत्तीने अदा करण्यात यावी.
सध्या ज्या अधिकारी यांचे वेतन त्यांनी शासनास उपलब्ध करुन दिलेल्या त्यांच्या बैंक खात्याच्या तपशिलानुसार खात्यावर परस्पर जमा करण्यात येते अशा अधिकारी/कर्मचारी यांच्या वेतनातील नियमित वजातीनंतर उर्वरित वेतनाची रक्कम संबंधित बँकेकडे जमा करण्यापूर्वी सदर रकमेतून ऑक्टोबर, २०२५ मधील वेतनातून १ दिवसाचे वेतन कमी करुन शिल्लक रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्याचे कळविण्यात यावे.
एक) माहे ऑक्टोबर, २०२५ या महिन्याचे वेतन देयके संपूर्ण रकमेचे काढण्यात यावे. तथापि, वेतनातील नियमित वजातीनंतर व एक दिवसाच्या वेतनाच्या वजातीनंतर वेतनाची उर्वरीत रक्कम संबंधित अधिकारी यांना धनादेश/रोखीने / विहित पध्दतीने अदा करण्यात यावी
सध्या ज्या अधिकारी यांचे वेतन त्यांनी शासनास उपलब्ध करुन दिलेल्या त्यांच्या बैंक खात्याच्या तपशिलानुसार खात्यावर परस्पर जमा करण्यात येते अशा अधिकारी/कर्मचारी यांच्या वेतनातील नियमित वजातीनंतर उर्वरित वेतनाची रक्कम संबंधित बँकेकडे जमा करण्यापूर्वी सदर रकमेतून ऑक्टोबर, २०२५ मधील वेतनातून १ दिवसाचे वेतन कमी करुन शिल्लक रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्याचे कळविण्यात यावे.
(दोन) सदर १ दिवसाचे वेतन कपात करताना ते मूळ वेतन व महागाई भत्ता यांच्या एकूण रकमेच्या आधारे गणना करुन कपात करण्यात यावे,
(तीन) वेतन वितरणाच्या वेळी वरीलप्रमाणे वसुली करुन वसूल केलेल्या रकमेची नोंद घेण्यासाठी (माहे ऑक्टोबर २०२५ करिता) एक स्वतंत्र नोंदवही ठेऊन त्यामध्ये वसूल केलेल्या रकमांची नोंद कर्मचारीनिहाय घेण्यात यावी.
(चार) अशाप्रकारे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एकत्रित होणारी रक्कम विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख तसेच जिल्हाधिकारी/मुख्य कार्यकारी अधिकारी / मुख्य अधिकारी नगरपरिषद / नगरपालिका, आयुक्त, महानगरपालिका, व्यवस्थपकीय संचालक महामंडळे/ मंडळे,
कुलसचिव कृषी विद्यापीठे/अकृषी विद्यापीठे/तांत्रिक विद्यापीठे यांनी मख्यमंत्री सहायता निधी यांची वेबसाईट www.cmrf.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर भरणा करुन त्या ठिकाणी तयार होणा-या पोचपावतीची प्रत मुद्रीत करुन घ्यावी किंवा खाली नमूद केलेल्या तपशीलाप्रमाणे मुख्यमंत्री सहायता निधी बैंक खात्यात परस्पर जमा करावी व त्याची पोचपावती, गोळा केलेल्या रकमेच्या देणगीदारांच्या यादीसह दोन प्रतीत परस्पर मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय, ६ वा माळा, मुख्य इमारत, मंत्रालय, मुंबई- ४०००३२ यांच्याकडे निश्चित प्राप्त होईल अशा प्रकारे रकमेचा भरणा केल्याच्या दिनांकापासून ७ दिवसाच्या आत अचूक पाठवावी.