nuksan bharpai list yadi 2025:राज्यात माहे जून ते सप्टेंबर २०२५ मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज (Relief Package) व सवलती घोषित करण्याबाबत..
राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व पुरामुळे आपत्ती उद्भवलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे शेतीपिक नुकसान, शेतजमीन खरडून जाणे, विहिरीचे नुकसान, मनुष्य व पशुहानी, घर पडझड, घरातील वस्तू/साहित्य नुकसान, वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. पुरामुळे बाधित / तात्पुरत्या स्थलांतरित कुटुंबांना तातडीची मदत पुरविण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
विभागीय आयुक्तांकडून व कृषी विभागाकडून नुकसानीबाबत प्राप्त तपशिलानुसार जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत २५३ तालुक्यामधील शेतीपिक, शेतजमीन नुकसान तसेच वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे झालेले नुकसान विचारात घेऊन शासनाने दि. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार बाधितांना/ आपदग्रस्तांना विशेष मदत पॅकेज (Relief Package) व सवलती देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.
शासन निर्णय:
राज्यातील २५३ तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत (खरीप हंगाम) अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकाचे नुकसान, शेतजमीन खरडून जाणे, विहिरीचे नुकसान, मनुष्य व पशुहानी, घर पडझड, घरातील वस्तू/साहित्य नुकसान, वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे राज्यातील २५३ तालुके अतिवृष्टी व पुरामुळे बाधित तालुके म्हणून घोषित करण्यात येत आहेत. बाधित तालुक्यांची यादी शासन निर्णय सोबतच्या परिशिष्ट अ० मध्ये नमूद केलेली आहे.
२. अतिवृष्टी व पुर आपत्तीमुळे बाधित २५३ तालुक्यामध्ये बाधितांना/ आपदग्रस्तांना खालीलप्रमाणे विशेष मदत पॅकेज (Relief Package) व सवलती लागू करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे:-
शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा