Kamgar E Card Download:बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड हे नोंदणीकृत कामगारांना दिले जाणारे एक अधिकृत ओळखपत्र आहे हे कार्ड महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाद्वारे दिले जाते. हे स्मार्ट कार्ड कामगारांसाठी सुरु करण्यात येणाऱ्या सर्व कल्याणकारी योजनांचा फायदा मिळवण्यासाठी उपयोगी पडते. यात वैद्यकीय मदत, शिक्षण सहाय्य, गृहनिर्माण योजना, पेन्शन योजना आणि अपघात विमा यांसारख्या महत्त्वाच्या सुविधांचा समावेश असतो.
बांधकाम कामगार स्मार्ट कार्डचे मुख्य उद्दिष्ट:
बांधकाम कामगारांची नोंदणी व ओळख पटवणे
राज्यातील असंघटित बांधकाम मजुरांची अधिकृत नोंदणी करणे.
बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांना ओळखपत्र उपलब्ध करून देणे.
सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजना लागू करणे
कामगारांना अपघात विमा, वैद्यकीय मदत, मृत्यू सहाय्य आणि पेन्शन योजना देणे.
आरोग्य सेवा, शिक्षण मदत आणि गृहनिर्माण योजना उपलब्ध करून देणे.
आर्थिक सहाय्य व विमा संरक्षण उपलब्ध करणे
कामगारांना आरोग्य आणि अपघात विम्याचा थेट लाभ मिळवून देणे.
कामगाराचा कामाच्या ठिकाणी मुत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत देणे.
शिक्षण आणि कौशल्यवृद्धीला प्रोत्साहन देणे
कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आणि आर्थिक सहाय्य देणे.
कामगारांना नवीन कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगार संधी उपलब्ध करून देणे.
लेबर कार्ड बाबत अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा
कामगारांचे भविष्य सुरक्षित करणे
निवृत्ती नंतर पेन्शन योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य देणे.
पात्रता निकष (Eligibility Criteria)
बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड मिळवण्यासाठी खालील अटी पूर्ण कराव्या लागतात:
अर्जदार कामगाराचे वय 18 ते 60 वर्ष दरम्यान असावे.
अर्जदाराने मागील 12 महिन्यांत किमान 90 दिवस बांधकाम क्षेत्रात काम केलेले असावे.
अर्जदार कामगार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
नोंदणी करताना अर्जदार बांधकाम क्षेत्राशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या कामात गुंतलेला असावा उदा.
वीटभट्टी कामगार
सुतार
सिमेंट/वास्तू कामगार
लोहार
इलेक्ट्रिशियन
मजूर
इत्यादी
बांधकाम कामगार स्मार्ट कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे
ओळखपत्र: आधार कार्ड / मतदार ओळखपत्र / पॅन कार्ड
पत्ता पुरावा: रेशन कार्ड / वीज बिल / डोमिसाईल प्रमाणपत्र
वयाचा पुरावा: जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला
कामाचा पुरावा: 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र (कंत्राटदार, बिल्डर किंवा संबंधित संस्थेकडून)
बँक खाते तपशील: बँक पासबुक झेरॉक्स किंवा बँकेचे स्टेटमेंट
फोटो: अलीकडच्या काळातील कामगाराचे ३ फोटो
कार्ड हरवणार नाही यासाठी खबरदारी घ्या
कार्डची झेरॉक्स काढून ठेवा जर मूळ कार्ड हरवले किंवा खराब झाले तर नवीन कार्ड काढताना झेरॉक्स उपयोगी पडेल.
कार्डस्कॅन करून मोबाइलमध्ये जातं करून ठेवा
तुमच्या स्मार्ट कार्ड क्रमांक लिहून ठेवा कार्ड हरवल्यास भविष्यात नवीन कार्ड काढण्यासाठी मदत होईल.
स्मार्ट कार्डला नुकसान होणार नाही याची काळजी घ्या
कार्डावर पेनाने काही लिहू नये किंवा स्क्रॅच करू नये.
कोणत्याही व्यक्तीस कार्ड देऊ नका.
तुमचे कार्ड कोणत्याही अनोळखी व्यक्तीस देऊ नका.