धक्कादायक प्रियकरासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचारParbhani Crime News

Parbhani Crime News:प्रियकरासोबत डोंगराळ भागात फिरायला गेलेल्या तरुणीवर परिसरात गुरे चारणाऱ्या तीन तरुणांनी तिच्या प्रियकरासमोरच बलात्कार करून त्या घटनेचे चित्रीकरण केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.८) सकाळी ११ ते १२ वाजण्याच्या दरम्यान जिंतूर तालुक्यातील डोंगरतळा शिवारातील कमळजाई देवी मंदिर समोरील डोंगराळ भागात घडली.

केंद्रीय निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; एसआयआरचा दुसरा टप्पा जाहीर, १२ राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांचा समावेश.Election Commission SIR Announcement

तालुक्यातील एक प्रेमी जोडपे डोंगरतळा शिवारात असलेल्या कमळजाई देवीच्या दर्शनाला दुचाकीवर गेले होते. दर्शनानंतर सदरील प्रेमी जोडपे देवस्थानच्या बाजूला असलेल्या झाडीत जाऊन बसले त्यांच्यावर गुरे चारणाऱ्या पाच गुरख्यांची नजर पडली.

घटनेची चर्चा; मात्र फिर्याद नाही

त्यांनी त्या या प्रकाराबाबत बीट जमादार गुंगाने यांना भ्रमध्वनीवरून विचारणा केली असता ते म्हणाले की, सदरील घटनेबाबत भोगावमध्ये दबक्या आवाजात चर्चा होत आहे. परंतु फिर्याद द्यायला संबंधित तरुणी अथवा तिचा प्रियकर समोर येत नसल्याने पुढचा तपास होत नाही. या दोघांपैकी एक जण समोर आल्यास अत्याचार करणाऱ्याविरुद्ध कार्यवाही करता येईल, असे बीट जमादार गुंगाने यांनी सांगितले.

१० हजार घ्या अन् आम्हाला सोडून द्या; प्रियकराची विनवणी

प्रेमिकेसोबत फिरायला आलेल्या तरुणाने गुराखी तरुणांना आमच्या कुटूंबियांना आम्ही फिरायला बाहेर आल्याचे माहीत नाही. आम्हला सोडून द्या, मी तुम्हाला १० हजार रूपये देतो, असे म्हणून खूप विणवण्या केल्यानंतरही त्या तरुणांना पाझर फुटला नाही. त्यांनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला.

शेतमाल विकल्यानंतर ‘गुलाबी’ पावती घ्या; तरच मिळेल लाभ..! शेतकऱ्यांची फसवणूक टळणार : अनुदानासाठीही होणार उपयोग.Farmer’s Pink Recipet

बाजूस असलेल्या आडोशाला ओढत नेऊन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. या बलात्काराचे चित्रीकरण एका तरुणाने स्वतःच्या मोबाईलमध्ये केले. सदरील घटनेनंतर प्रेमी युगल दुचाकीवर बसून निघून गेले.

या घटनेची संपूर्ण व्हिडीओ भोगाव देवी येथील एका गुराखी तरुणांकडे असल्याने या प्रकरणाला वाचा फुटली आहे. असे प्रकार या पूर्वीही या वासनांध तरुणांनी अनेक वेळा केले असल्याची दाट शक्यता असून या प्रकरणाचा सखोल तपास झाल्यास निश्चितच अशा घटनेला आळा बसेल अशी चर्चा गावात होत आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment