State Employees Allowance Hike GR 2025: राज्यातील आगामी लोकसभा, विधानसभा तसेच सार्वत्रिक व पोटनिवडणूक कामकाज सुरळीत पार पडावे यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागामार्फत दि. 24 नोव्हेंबर 2025 रोजी जारी करण्यात आलेल्या नवीन शासन निर्णयानुसार, निवडणूक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या परिश्रमिक मानधनात, अतिकालिक भत्त्यात, आहार भत्त्यात तसेच TA/DA मध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
निवडणूक भत्ता – सुधारित दर
या GR नुसार विविध पदांनुसार मिळणाऱ्या निवडणूक भत्त्यात लक्षणीय वाढ झाली आहे. क्षेत्रीय दंडाधिकाऱ्यांसाठी विद्यमान भत्ता कायम ठेवण्यात आला असला तरी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, मतमोजणी सहाय्यक, चतुर्थश्रेणी कर्मचारी आणि फिरते पथक यांच्या भत्त्यात मोठी वाढ करण्यात आली आहे. नवीन दरानुसार आता कर्मचाऱ्यांना प्रतिदिन वाढीव रक्कम किंवा एकत्रित रक्कम अशा दोन्ही पर्यायांपैकी मिळणार आहे. यामुळे निवडणूक कामकाजासाठी लागणाऱ्या अतिरिक्त श्रमाला योग्य मोबदला मिळणार आहे.
आहार भत्ता – मोठी वाढ
मतदान केंद्र किंवा मतमोजणी केंद्रावर नियुक्त अधिकारी–कर्मचारी यांच्यासोबतच पोलिस कर्मचारी, मोबाईल पथके, होमगार्ड, वनरक्षक, ग्रामरक्षक, NCC कॅडेटस, माजी सैनिक आणि स्वयंसेवक यांना मिळणाऱ्या आहार भत्त्यात देखील तब्बल वाढ करण्यात आली आहे. विद्यमान 150 रुपयांवरून हा भत्ता थेट 500 रुपयांपर्यंत वाढविण्यात आला आहे. निवडणूक कालावधीत दीर्घकाळ कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचारीवर्गाला यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
TA / DA – प्रवास व दैनिक भत्ता
निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी TA/DA बाबत पूर्वीप्रमाणेच 100% प्रवास भत्ता आणि दैनिक भत्ता लागू राहणार आहे. या भत्त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नसला, तरी इतर सर्व भत्त्यात झालेली वाढ कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक आहे.
शासन निर्णयाची प्रत
या संदर्भातील संपूर्ण सविस्तर शासन निर्णय (GR) डाउनलोड करण्यासाठी “Click Here” अशी लिंक प्रदान करण्यात आलेली आहे, ज्याद्वारे अधिकारी–कर्मचारी आपल्या पदानुसार लागू होणारे अचूक दर तपासू शकतात.
शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा