आता फोटो आणि QR कोडसह Aadhaar Card, डिसेंबरपासून नवीन नियम, जुन्या कार्डपासून किती वेगळं? New Aadhaar Card

New Aadhaar Card: तुमच्या खिशातील आधार कार्डचा चेहरामोहरा आता पूर्णपणे बदलणार आहे. UIDAI चे सीईओ भुवनेश कुमार यांनी एका ऑनलाईन परिषदेत याविषयीचे मोठे संकेत दिले आहे. त्यानुसार आता फोटो आणि QR कोडसह Aadhaar Card येणार आहे. पुढील महिन्यापासून हे नियम लागू होतील.

सध्या अनेक ठिकाणी ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्डचा वापर होतो. महाविद्यालय असा वा बँक, पत्ता प्रमाणित करण्यासाठी आधार कार्ड मागितल्या जाते. आधार कार्डमध्ये काही बदल करायचा असेल तर त्यासाठी आधार केंद्रावर धाव घ्यावी लागते. आधार कार्डमध्ये व्यक्तीची जन्म तारीख, पत्ता, वडिलांचे नाव आणि इतर माहिती नोंदवलेली असते.

आधार कार्डचा दुरुपयोग थांबवण्यासाठी मोठा बदल करण्यात येत आहे. UIDAI चे प्रमुख भुवनेश कुमार यांनी एका ऑनलाईन परिषदेत याविषयी भाष्य केले आहे. आता फोटो आणि QR कोडसह Aadhaar Card येणार आहे. येत्या डिसेंबरपासून हे नियम लागू होतील

पेन्शन, कर ते एलपीजी, 1 डिसेंबरपासून हे 5 नियम बदलणार, आर्थिक नियोजनावर काय परिणाम होणार? जाणून घ्या Rule Change 1 December 2025

नवीन आधार कार्डमध्ये हे बदल दिसणार

नवीन आधार कार्डवर आता केवळ फोटो आणि QR कोड दिसेल

नाव, पत्ता, जन्मतारीख ाणि 12 अंकांचा आधार कार्ड क्रमांक दिसणार नाही

संबंधित QR कार्डमध्ये सर्व माहिती सुरक्षित जतन असेल

ऑफलाईन व्हेरिफिकेशन अधिक सोपं असेल आणि डेटा चोरीस आळा बसेल

UIDAI चे नवीन ॲप लाँच होणार

युआयडीएआय नवीन ॲप सुद्धा लाँच करण्याच्या तयारीत आहे. या मोबाईलमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने अधिक काळजी घेण्यात येईल. या ॲपमध्ये QR कोड स्कॅनिंक आणि फेसियल रिकॉग्निशन सारख्या आधुनिक सोयी-सुविधा असतील.

बँक ग्राहकांनो लक्ष द्या! डिसेंबरमध्ये तब्बल १८ दिवस बँका बंद; सलग ५ दिवसांच्या सुट्ट्यांमुळे कामे खोळंबणार!Bank Holiday in December

डिसेंबर महिन्यात लागू होणाऱ्या नवीन नियमानुसार, आधार कार्डच्या ऑफलाईन व्हेरिफिकेशन कमी करण्याची तयारी करण्यात येत आहे. खासकरून हॉटेल आणि एखाद्या कार्यक्रमात आधार कार्ड मागितले जाते. अशावेळी डेटा लिक होण्याची भीती कायम असते. आधार कार्डचे ऑनलाईन व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत व्यक्तीची माहिती गोपनीय असेल.

Leave a Comment