हि कागदपत्रे बँकेत जमा करा शेतकरी कर्जमाफी मिळण्याचे संकेत बँकेकडून कागदपत्रे जमा करणे सुरु.Farmer Loan waiver 2025

Farmer Loan waiver 2025:कर्जमाफीसाठी बँकांमध्ये महत्त्वाच्या हालचाली सुरू ज्या शेतकरी बांधवांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे किंवा सोसायटीचे पीक कर्ज काढलेले आहे, त्यांच्यासाठी एक मोठा आणि दिलासादायक संकेत मिळाला आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या असून, आता अशा शेतकऱ्यांचे कर्ज माफ होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

कारण, कर्जमाफीसाठी आवश्यक असलेला डेटा गोळा करण्याचे काम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सुरू केले आहे. यासाठी बँकेकडून त्यांच्या संबंधित विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना (सोसायटी) तातडीने शेतकऱ्यांची आवश्यक कागदपत्रे जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Land Record Digital 7/12 Legal Validity : डिजीटल ७/१२ ला कायदेशीर मान्यता, तलाठ्याच्या सही-शिक्क्याची गरजही संपली; अवघ्या १५ रुपयांत डाऊनलोड करा

सोसायटीकडे सादर करायची अत्यावश्यक कागदपत्रे

बँकेने जाहीर केलेल्या सार्वजनिक आवाहनानुसार, कर्जमाफीसाठी पात्र ठरू शकणाऱ्या शेतकऱ्यांनी खालीलप्रमाणे आवश्यक कागदपत्रे आपल्या संबंधित विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेकडे (सोसायटीकडे) कार्यरत असलेल्या गटसचिवांकडे तातडीने सादर करावी लागतील. ही कागदपत्रे वेळेत जमा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण यानंतरच बँकेची डेटा संकलनाची आणि पडताळणीची प्रक्रिया पुढे सरकणार आहे.

जमिनीचे मालकी हक्काचे तपशील: कर्जदार शेतकऱ्याचा सातबारा व गाव नमुना ८ (ज्याला एकूण जमिनीचा दाखला म्हणतात). आता महसूल विभागाने डिजिटल सातबारा आणि आठ उतारे सर्व कायदेशीर बाबींसाठी अधिकृतपणे ग्राह्य धरले आहेत, त्यामुळे त्यावर कोणत्याही प्रकारच्या सही-शिक्क्याची गरज नाही.

आता घर घेणं सोपं होणार ! केंद्र सरकार २५ लाख रुपयांपर्यंत कमी व्याजदराने गृहकर्ज देणार; पण कुणाला? House Building Advance Scheme News

ओळख आणि आर्थिक तपशील: कर्जदार सभासदाचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँकेच्या पासबुकची छायांकित प्रत (झेरॉक्स).

योजनेसाठी अनिवार्य आयडी: कर्जदार सभासदाचा फार्मर आयडी (Farmer ID) असणे अनिवार्य आहे. फार्मर आयडी नसल्यास कर्जमाफीच्या प्रक्रियेत तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता आहे.

संपर्क तपशील: कर्जदार सभासदाचा मोबाईल क्रमांक सक्रिय (Active) असणे गरजेचे आहे, जेणेकरून आवश्यकतेनुसार संपर्क साधता येईल.

मयत कर्जदार आणि वेळेत कागदपत्रे जमा करण्याची सूचना

याव्यतिरिक्त, कर्जदार सभासद मयत असल्यास, त्यांच्याऐवजी वारसदाराचे वरील सर्व कागदपत्रे सादर करावी लागतील, याची नोंद घ्यावी. बँकेने सर्व कर्जदारांना वरील सर्व कागदपत्रे त्वरित सोसायटीकडे जमा करावीत, जेणेकरून गट सचिवास कोणतीही अडचण येणार नाही आणि डेटा संकलनाचे काम वेळेत पूर्ण होईल. ही कागदपत्रे जमा झाल्यानंतर कर्ज खात्यांची पडताळणी सुरू होणार आहे.

कर्जमाफी मिळण्याची शक्यता आणि शेतकऱ्यांचे आवाहन

जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून डेटा गोळा करण्याचे काम सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह आणि आशा निर्माण झाली आहे. सध्या राज्यात थकीत कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीचा विचार करून राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे, सर्व पात्र शेतकऱ्यांनी कोणतीही दिरंगाई न करता ही कागदपत्रे लवकरात लवकर जमा करावीत, जेणेकरून कर्जमाफी जाहीर झाल्यास त्यांना योजनेचा त्वरित आणि पूर्ण लाभ मिळू शकेल.

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment