Bombay High Court Bharti 2026: मुंबई उच्च न्यायालयात २,३३१ शिपाई, हमाल वाहन चालक, लिपिक व इतर पदांची मोठी भरती जाहीर

Bombay High Court Bharti 2026:बॉम्बे उच्च न्यायालयाने २०२६ साठी तब्बल २,३३१ पदांची मेगा भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये शिपाई/हमाल/फराश, वाहन चालक, लिपिक तसेच स्टेनोग्राफर (कमी व उच्च श्रेणी) अशा विविध पदांचा समावेश आहे.

ही नियोजित भरती १५ डिसेंबर २०२५ पासून सुरू होत असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ०५ जानेवारी २०२६ संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात नीट वाचणे अत्यंत गरजेचे आहे.

ड्रायव्हिंग लायसन्सबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी, परिवहन विभागाच्या RTO ला कडक सूचना Driving Licence New Big Update

भरतीचा आढावा

या भरतीत मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणांसाठी पदे उपलब्ध आहेत. वेतनमान पदानुसार बदलते आणि १६,६०० रुपये ते १,७७,५०० रुपये इतके आकर्षक वेतन मिळणार आहे. संपूर्ण अर्ज प्रक्रिया केवळ ऑनलाइन पद्धतीने होणार असून उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवरून अर्ज भरावा.

पदांची संख्या व तपशील

या भरतीत विविध पदांसाठी पुढीलप्रमाणे रिक्त जागा उपलब्ध आहेत:

शिपाई/हमाल/फराश – ८८७ पदे

वाहन चालक – ३७ पदे

लिपिक – १,३३२ पदे

स्टेनोग्राफर (कमी श्रेणी) – ५६ पदे

स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी) – १९ पदे

एकूण २,३३१ जागांसाठी नियोजन करण्यात आले आहे. सरकारी नोकरीची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे.

मोठी बातमी! आता ५०० रुपयांच्या स्टॅम्पवर वडिलोपार्जित जमिनीची वाटणी; महसूल विभागाची घोषणा; नेमकी कार्यवाही कशी होणार! Land Record Divide Fee

शैक्षणिक पात्रता

प्रत्येक पदानुसार पात्रता वेगळी ठेवण्यात आली आहे.

शिपाई/हमाल/फराश पदासाठी किमान ७ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वाहन चालक पदासाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स, ३ वर्षे अनुभव आणि वाहन देखभाल ज्ञान आवश्यक आहे.

लिपिक पदासाठी पदवी आवश्यक असून इंग्रजी टायपिंग ४० wpm उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.

स्टेनोग्राफर (कमी/उच्च श्रेणी) पदांसाठी पदवी, श्रुतिलेखन तसेच टायपिंग परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कायद्याची पदवी असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.

सार्वजनिक सुट्टी 2026 ची यादी जाहीर! संपूर्ण सुट्टीच्या यादी पहा Public Holiday List 2026

वयोमर्यादा

वयोमर्यादा पद आणि प्रवर्गानुसार निश्चित करण्यात आली आहे.

सामान्य प्रवर्गातील (Open) उमेदवारांसाठी १८/२१ ते ३८ वर्षे, तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी १८/२१ ते ४३ वर्षे वयोमर्यादा लागू आहे. हायकोर्ट/शासकीय कर्मचाऱ्यांसाठी किमान वयोमर्यादा लागू आहे.

वेतनमान

प्रत्येक पदासाठी आकर्षक वेतनमान ठरवले गेले आहे:

शिपाई/हमाल/फराश – ₹16,600 ते ₹52,400

वाहन चालक – ₹29,200 ते ₹92,300

लिपिक – ₹29,200 ते ₹92,300

स्टेनोग्राफर (कमी श्रेणी) – ₹49,100 ते ₹1,55,800

स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी) – ₹56,100 ते ₹1,77,500

वेतनासोबत शासनाच्या नियमांनुसार भत्ते देखील मिळणार आहेत.

अर्ज फी

सर्व उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क ₹1,000 निश्चित करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू होण्याची तारीख : १५ डिसेंबर २०२५

अर्जाची शेवटची तारीख : ०५ जानेवारी २०२६ (सायं. ५ वाजेपर्यंत)

वेळेत अर्ज सादर करणे उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment