धावत्या रिक्षातून बाहेर फेकली गेली शाळकरी चिमुकली! पालकांच्या अंगावर काटा आणणार Video Viral |.auto viral video

auto viral video:आजकाल अनेक पालक आपल्या मुलांना शाळेत नेण्यासाठी आणि आणण्यासाठी रिक्षाची मदत घेतात. गर्दी, वेळेची कमतरता आणि सुविधा म्हणून ही बाब सर्वसाधारण झाली आहे. पण, आपण ज्या रिक्षामध्ये आपल्या मुलांना बसवतो, तो रिक्षाचालक वाहन कसे चालवतो याकडे आपण किती लक्ष देतो? सोशल मीडियावर समोर आलेला एक हादरवून टाकणारा व्हिडीओ पाहून प्रत्येक पालकाने आता अधिक जागरूक होण्याची गरज आहे. कारण- एका क्षणातील निष्काळजीमुळे मुलांच्या जीवावर बेतू शकते.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा सीसीटीव्ही व्हिडीओ तमिळनाडू परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडीओत एक रिक्षा शाळेच्या वेळेत वेगात जाताना दिसते. मुलांना घेऊन जाणाऱ्या या रिक्षाचालकाने अत्यंत वेगात ‘कट’ मारल्याने मोठा अपघात होता होता वाचला. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला असून, पालकांनी आपल्या मुलांच्या सुरक्षिततेकडे अधिक काळजीपूर्वक पाहावे, असा सल्ला देण्यात येत आहे.

व्हिडीओमध्ये दिसते की, एक लहान मुलगी, जी शाळेत जाण्यासाठी रिक्षामध्ये बसलेली असते, रिक्षाचालकाने अचानक वेगात ‘कट’ मारल्यामुळे मुलगी तोल जाऊन, थेट रस्त्यावर बाहेर रस्त्यावर फेकली जाते. सुदैवाने मुलगी पडताच तत्काळ उभी राहते आणि तिला गंभीर दुखापत होत नाही. आजूबाजूला असलेले लोक तिच्या मदतीसाठी धावून येतात. ते तिला दिलासा देऊन, आधार देत सांभाळतात आणि तिची विचारपूस करतात. हा प्रसंग मोठ्या दुर्घटनेत रूपांतर होण्यापासून टळला; पण हा प्रकार पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल.

पाहा व्हिडिओ

हा व्हिडीओ ट्विटर या @Mahamud313 अकाउंटवरून शेअर केला गेला आहे. व्हिडीओखाली त्यांनी कॅप्शन्स दिल आहे “हा केवळ अपघात नाही, तर प्रत्येक पालकासाठी चेतावणी आहे. त्यांनी त्यांच्या मुलांना रिक्षामध्ये बसवता, पण कधी विचारता का की चालक रिक्षा कशी चालवतो? फोन तर वापरत नाही ना? रिक्षा खूप वेगात तर नाही ना? मुलाला भीती वाटते का?”

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

व्हिडीओ व्हायरल होताच तो शेअर झाला आणि काही तासांतच हा व्हिडीओ चार लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी संताप व्यक्त करीत प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, “अशा चालकावर कडक कारवाई झाली पाहिजे. पालक त्यांच्यावर विश्वास ठेवून मुलांना रिक्षामध्ये पाठवतात आणि हे लोक अशा निष्काळजीने रिक्षा चालवतात.”

दुसऱ्या युजरचे, “शालेय वाहनांच्या फिटनेस तपासणीत शाळांकडून मोठा निष्काळजीपणा केला जातो. पालकही याबाबत कमी जागरूक आहेत आणि हेच अपघातांचे कारण आहे,” असे म्हणणे आहे. पालकांनी जाणीवपूर्वक मुलांच्या सुरक्षिततेकडे लक्ष देण्याची गरज आहे हेच ही संपूर्ण घटना अधोरेखित करते. शाळेत जाण्यासाठी दररोज रिक्षाचा वापर करणाऱ्या मुलांसाठी हे किती धोकादायक ठरू शकते, याचे हे उदाहरण आहे.

Leave a Comment