New Year Salary Hike:केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी नवीन वर्षाची सुरुवात फारशी आनंदाची नसण्याची शक्यता आहे. जानेवारी 2026 मध्ये देarness allowance (DA) आणि dearness relief (DR) वाढीबाबत मोठा बदल अपेक्षित असला तरी या वेळची वाढ अत्यंत माफक राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही वाढ गेल्या सात वर्षांतील सर्वात कमी वाढ असू शकते.
AICPI आकडेवारीनुसार DA वाढीचे गणित
ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स (AICPI) च्या आकडेवारीनुसार DA मध्ये केवळ 2% वाढ होण्याची शक्यता आहे. जुलै 2018 पासून DA वाढ कधीही 3% पेक्षा कमी नव्हती. या वेळेस 58% वरून DA सुमारे 60% वर जाण्याचा अंदाज आहे. याचा परिणाम देशातील 1.2 कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगारवाढीवर थेट होणार आहे.
नवीन वर्षात पगार किती वाढेल?
DA वाढीमुळे प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांना किती फायदा होणार, हे अनेकांच्या मनातले प्रश्न आहेत. उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याचा मूलभूत पगार 50,000 रुपये असल्यास आणि विद्यमान DA 58% असेल तर सध्या त्यांना 29,000 रुपये महागाई भत्ता मिळतो. जानेवारी 2026 मध्ये DA 60% झाला तर महागाई भत्ता 30,000 रुपये होईल. म्हणजेच कर्मचाऱ्याला दरमहा केवळ 1,000 रुपयांचा अतिरिक्त फायदा होईल.
सात वर्षांनंतर सर्वात कमी DA वाढ?
फायनान्शिअल एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी 2026 पासून DA/DR मध्ये केवळ 2% वाढ होण्याची शक्यता आहे. जानेवारी 2019 नंतर अशी कमी वाढ फक्त एकदाच—जानेवारी 2025 मध्ये—झाली होती. साधारणपणे DA वाढ 3% किंवा त्याहून अधिक होत आली आहे. त्यामुळे ही वाढ कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना अपेक्षित दिलासा देऊ शकणार नाही.
7व्या वेतन आयोगाचा कार्यकाळ संपत असताना नवीन परिस्थिती
जानेवारी 2026 मधील DA वाढ अनेक कारणांनी विशेष ठरणार आहे, कारण ही वाढ 7व्या वेतन आयोगाचा कार्यकाळ संपल्यानंतर लागू होणारी पहिलीच वाढ असेल. 7व्या वेतन आयोगाचा 10 वर्षांचा कालावधी 31 डिसेंबर 2025 रोजी संपतो. त्यानंतरचा हा पहिला पगारसुधार कार्यक्रम असल्याने कर्मचारी याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत होते.
8वा वेतन आयोग लागू होण्यासाठी अजून वेळ
सरकारने 8वा वेतन आयोग स्थापन केला असला तरी त्याच्या संदर्भ अटींमध्ये अंमलबजावणीची स्पष्ट तारीख नमूद केलेली नाही. आयोगाला अहवाल तयार करण्यासाठी 18 महिने वेळ दिला आहे, आणि अहवालानंतर नवीन वेतन संरचना लागू करण्यास साधारणपणे दोन वर्षांपेक्षा अधिक काळ लागतो. त्यामुळे प्रत्यक्ष लाभ 2027 च्या अखेरीस किंवा 2028 च्या सुरुवातीस मिळण्याची शक्यता आहे.
महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा