निसर्गापुढे कुणाचंही चालत नाही! पाण्यात दबा धरलेला चपळ बिबट्या, काठावर विसावलेली मगर…आणि क्षणार्धात खेळ खल्लास Leopard Crocodile Attack Video

Leopard Crocodile Attack Video: जंगलातील सर्वांत भयानक शिकारी कोण, असा प्रश्न पडला; तर सिंह, वाघ व बिबट्या हीच नावे सर्वप्रथम डोळ्यांसमोर येतात. त्यांच्या ताकदीपुढे फारसे प्राणी टिकत नाहीत. मात्र, काही वेळा हे जंगलराजही पाण्यातील महाकाय आणि निर्दयी शिकाऱ्यालाही धूळ चारतात. सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत असलेला एक थरारक दृश्यफीत पाहून अक्षरशः अंगावर काटा उभा राहतो.

या दृश्यफितीत बिबट्या आणि मगर यांच्यातील जीवघेणा संघर्ष पाहायला मिळतो. सामान्यतः मगर पाण्यातील सम्राट मानली जाते, तर बिबट्या जमिनीवरचा अत्यंत चपळ आणि घातक शिकारी. पण, या दृश्यात जे घडते, ते सारे अंदाजच उलथवून टाकणारे आहे.

पाण्यातून बाहेर येताच बिबट्याचा झडप घालणारा हल्ला

दृश्यफितीत स्पष्टपणे दिसते की, नदीच्या पाण्यात दबा धरून बसलेला बिबट्या अत्यंत शांतपणे पुढे सरकत असतो. दुसरीकडे, नदीकाठावर निवांतपणे विसावलेली मगर आपल्याच जगात मग्न असते. क्षणभरासाठीही तिला अंदाज नसतो की, मृत्यू इतक्या जवळ दबा धरून बसला आहे.

ठाकर बधू एकत्रच ! जागा वाटपावर शिक्कामोर्तब ? BMC साठी कोणाला किती जागा, समोर आली अपडेट BMC Election Shivesena-MNS Seat Sharing

परंतु, अचानक विजेच्या वेगाने बिबट्या पाण्यातून बाहेर येतो आणि थेट मगरीवर झडप घालतो. मगरीच्या लक्षात धोका येतो; पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. पाण्यात परत जाण्याचा प्रयत्न करण्याआधीच बिबट्याने तिच्यावर प्रचंड ताकदीने हल्ला चढवलेला असतो.

काही सेकंदांचा संघर्ष; पण पकड सुटत नाही

त्यानंतर काही क्षणांसाठी दोघांमध्ये भीषण झुंज पाहायला मिळते. मगर स्वतःची सुटका करून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करते; पण बिबट्याची पकड अतिशय अचूक आणि घातक असते. त्याने मगरीची मान जबड्यात पकडलेली असते. ही पकड पाहून एक गोष्ट स्पष्ट होते की, या वेळी ‘पाण्याचा दैत्य’ बिबट्याच्या तावडीतून सुटणार नाही.

ही दृश्यफीत अधिकच थरारक ठरते. कारण- दोन्हीही प्राणी अत्यंत धोकादायक शिकारी आहेत. मात्र, या संघर्षात बिबट्या मगरीवर स्पष्टपणे भारी पडतो.

वाहनधारकांसाठी मोठी बातमी! या लोकांना मोफत टोल प्रवास…Toll Free Travelling New Update

कोट्यवधी वेळा पाहिली गेलेली दृश्यफीत

हा अंगावर शहारे आणणारा प्रसंग समाजमाध्यमांवरील एका लोकप्रिय संकेतस्थळावरून प्रसिद्ध करण्यात आला आहे. ही दृश्यफीत आतापर्यंत एक कोटी ४० लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली असून, चार लाखांपेक्षा जास्त लोकांनी त्या दृश्यफितीला पसंती दर्शवली आहे. हजारो प्रतिक्रियादेखील नोंदवण्यात आल्या आहेत.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया: “खरा शिकारी आज कळला!”

ही दृश्यफीत पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका प्रेक्षकाने लिहिले, “आज खरा शिकारी कोण आहे ते समजले.”

तर दुसऱ्याने म्हटले, “मगर पाण्याची राणी असेल; पण बिबट्या सर्वत्रचा राजा आहे.” काहींनी हा प्रसंग अतिशय दुर्मीळ असल्याचे नमूद केले आहे. कारण- एखादा भयंकर शिकारी दुसऱ्या तितक्याच भयंकर शिकाऱ्यालाही शिकार बनवतो, असे दृश्य क्वचितच पाहायला मिळते.

येथे पाहा व्हिडीओ

Leave a Comment