मुंबईत मराठी माणूस कोणाच्या बाजूने? ठाकरे की शिंदे? थक्क करणारे आकडे समोर BMC Election Survey Polls 2025

BMC Election Survey Polls 2025:देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबईवर आपली सत्ता आणण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीसोबत आलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

एकीकडे ठाकरे बंधूंची युती आणि दुसरीकडे भाजपा-शिंदे गटाची युती असा थेट संघर्ष होणार असतानाच सध्याच्या स्थितीवरुन ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबईतील पारडं जड दिसत आहे. मुंबई शहरामध्ये शिंदेंच्या शिवसेनेची कसोटी लागणार असल्याचं चित्र पाहायला मिळत असून मराठी माणसाचा कौल निर्णयाक ठरणार असतानाच मराठीबहुल भागातील ट्रेण्ड समोर आले आहेत.

पीक विम्याचे 17, 500 रु कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार? मोठी अपडेट आली समोर Agriculture News

मुंबई शहर भागात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं वर्चस्व कायम असल्याचं दिसत आहे. दुसरीकडे शिंदेच्या सेनेला त्यांच्या अस्तित्वासाठी मोठी लढाई लढावी लागणार असल्याचं स्पष्ट आहे. शहरातील मराठी प्राबल्य असलेल्या प्रभागांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत 22 माजी नगरसेवक आहेत. दुसरीकडे शिंदे यांच्याकडे केवळ सहा नगरसेवक गेले आहेत. शहर भागातील 10 विधानसभा मतदारसंघांतही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे चार आमदार निवडून आले आहेत. शिंदेंच्या शिवसेनेच्या एकाही उमेदवाराला यश मिळाले नसल्याने महापालिका निवडणुकीत शिंदेंच्या सेनेची कसोटी लागणार हे उघड आहे. शहरातील 56 प्रभागांमध्ये एकसंघ शिवसेनेचे 26, भाजपचे 14, काँग्रेसचे 11, मनसेचे 2, तर समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस व ‘अभासे’चा प्रत्येकी एक उमेदवार 2017 च्या पालिका निवडणुकीत निवडून आलेला.

शिंदेंच्या शिवसेनेकडे 11 माजी नगरसेवक

शिवसेना पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरेंच्या सेनेकडे पक्षाचे 20 व मनसे, काँग्रेसचे प्रत्येकी एक, असे एकूण 22 माजी नगरसेवक आहेत. तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 6, काँग्रेसचे 3, राष्ट्रवादी व मनसे प्रत्येकी एक, अशा 11 माजी नगरसेवकांनी प्रवेश केला आहे.

मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय.Maharashtra Cabinet Meeting Tow Decison

भाजपकडे 14 माजी नगरसेवकांसह काँग्रेसमधून आलेले 2, असे एकूण 16 माजी नगरसेवक आहेत. काँग्रेसला त्यांच्या 11 पैकी केवळ पाच माजी नगरसेवकांनी साथ दिली असून मनसे, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची अवस्था अधिक बिकट आहे. दोन्ही राष्ट्रवादींसहीत मनसेकडे मुंबईत एकही माजी नगरसेवक उरलेला नाही.

दुसऱ्या क्रमांकावरील नगरसेवक चर्चेत

2017 च्या निवडणुकीत शहरातील शिवसेनेच्या 26 माजी नगरसेवकांपैकी सर्वाधिक मते घेणारे पहिले पाच जण हे मराठीबहुल शिवडी, वरळी या मतदारसंघातील होते. तर, 18 पराभूत उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकांची मते मिळविली होती.

सात गुजराती प्रभागांमध्ये भाजपचेच वर्चस्व

गुजराती मतदारांचे वर्चस्व असलेल्या सातही प्रभागांत भाजपचे, तर मुस्लिमबहुल 16 पैकी 9 प्रभागांत काँग्रेस, भाजप 3, शिवसेना 2 व समाजवादी पार्टी, अभासे, राष्ट्रवादीचा एक उमेदवार निवडून आला होता.

ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात कस लागणार

एकूणच सगळी आकडेमोड पाहता मुंबई शहरात संघटनात्मक ताकद, माजी नगरसेवकांचे संख्याबळ आणि मतदारांचा विश्वास या निकषांवर उद्धव ठाकरेंची शिवसेना मजबूत स्थितीत दिसत आहे. त्यात त्यांना मनसेची साथ लाभणार असल्याने शिंदेंच्या शिवसेनेचा ठाकरेंच्या या बालेकिल्ल्यात कस लागणार आहे.

अतिवृष्टीच्या पॅकेजमधील पिक विम्याचे १७,५०० रुपये सर्वच शेतकऱ्यांना मिळणार का? वाचा सविस्तर Crop Insurance Update 2025

Leave a Comment