कॉलेजच्या तरुणीने फेअरवेलमध्ये साडी नेसून केला भन्नाट डान्स, व्हिडिओ होतोय तुफान viral | Dance viral video

Dance viral video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात; पण काही व्हिडीओ असे असतात की, ते लोकांच्या मनात घर करतात. सध्या असाच एक भन्नाट डान्स व्हिडीओ सर्वत्र चर्चेत आहे. फेअरवेल पार्टीत साडी नेसून एका तरुणीने सादर केलेल्या जबरदस्त डान्सने पूर्ण सोशल मीडियाला वेड लावले आहे. या व्हिडीओने करोडो लोकांची मने जिंकली आहेत.

हा व्हिडीओ त्रिपुरा येथील अंकिता या तरुणीचा आहे. कॉलेजच्या फेअरवेल पार्टीदरम्यान तिने स्टेजवर साडी नेसून केला भन्नाट डान्स. बॉलीवूडमधील सुपरहिट चित्रपट ‘मैं हूं ना’मधील गाजलेलं गाणे ‘तुमसे मिलके दिल का जो हाल’ या गाण्यावर अंकिताने डान्स केला आहे. हेच गाणे एकेकाळी सुश्मिता सेनच्या स्टाईलमुळे खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले होते आणि आता अंकिताच्या डान्समुळे ते पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आले आहे.

घरकुल योजनेत मोठा बदल, जागा खरेदीसाठी घरकुल लाभार्थ्याला मिळणार अनुदान, काय आहे नवीन निर्णयPM Awas Yojana

व्हिडीओमध्ये अंकिता गुलाबी – जांभळ्या रंगाच्या साडीत, अतिशय आत्मविश्वासाने समोर येते. तिच्या चेहऱ्यावरचा हसरा भाव, डोळ्यांतला आत्मविश्वास आणि प्रत्येक स्टेपमधली अचूकता पाहून प्रेक्षक थक्क होतात. साडी नेसलेली असूनही तिच्या हालचाली अतिशय आनंदी आणि ग्रेसफुल आहेत. डान्स करताना तिच्या एक्स्प्रेशन्समधून आत्मविश्वास बघायला मिळतो.

विशेष म्हणजे हा संपूर्ण डान्स तिने स्वतः कोरिओग्राफ केला आहे. हॉलमध्ये बसलेले विद्यार्थी, शिक्षक सगळेच तिच्या परफॉर्मन्सला टाळ्यांचा कडकडाट करीत कौतुक करताना दिसले.हा व्हिडीओ अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला असून, काही दिवसांतच तो प्रचंड व्हायरल झाला. आतापर्यंत या व्हिडीओला १३ कोटींहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत, तर ६८ लाखांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे.

पाहा व्हिडिओ

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

हजारो लोकांनी हा व्हिडीओ शेअर करत अंकिताचे कौतुक केले आहे. अनेकांनी हा डान्स “नेक्स्ट लेव्हल” असल्याचे म्हटले आहे.प्रतिक्रियांमध्ये तर कौतुकाचा पाऊसच पडतो आहे. एका युजरने लिहिले, “साडीमध्ये असं नाचणं म्हणजे खरं टॅलेंट.” दुसऱ्याने म्हटले, “हे पाहून सुश्मिता सेनची आठवण आली.” तर आणखी एका युजरने म्हटले, “हा व्हिडीओ मी १० वेळा पाहिला, तरी मन भरत नाही.”

काहींनी अंकिताला पुढील बॉलीवूड स्टार म्हणून शुभेच्छाही दिल्या आहेत.हा व्हिडीओ फक्त डान्सचा नसून, आत्मविश्वास, मेहनत व टॅलेंट यांचे सुंदर उदाहरण आहे. साडीमध्येही डान्स करीत आग लावता येते, हे अंकिताने सिद्ध करून दाखवले आहे.

Leave a Comment