फायद्याची बातमी ! नोटरी केलेल्या गुंठेवारीची आता करता येणार खरेदी; पूर्वीच्या गुंठ्याची करता येणार थेट विक्री, कशी असणार प्रक्रिया, वाचा… Land Record Tukde Bandi

Land Record Tukde Bandi :महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषदेच्या हद्दीत १९६५ ते १५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत एक-दोन गुंठे जागा घेतली. पण, गुंठेवारीस परवानगी नसल्याने स्टॅम्पवर नोटरी करून जी जागा घेतली. अशांना आता त्या गुंठ्याची खरेदी करून घेता येणार आहे. मात्र, त्यासाठी संबंधित व्यक्तीस जागेच्या चालू मूल्यांकनानुसार स्टॅम्प ड्युटी आणि ज्यावेळी त्याने नोटरी केली तेव्हाच्या मुद्रांक शुल्कावर दरमहा २ टक्के दंड, अशी रक्कम भरावी लागणार आहे.

शहराच्या गावठाण भागात रहायला जागा नसल्याने शहराच्या हद्दीतच एक-दोन गुंठे जागा घेतली. पण, गुंठेवारीला परवानगी नसल्याने त्या जागेची नोटरी केली. गुंठेवारीच्या परवानगीची वाट पहात अनेकांनी त्या जागांवर पक्की घरे देखील बांधली. मात्र, त्यांना ना प्रॉपर्टी कार्ड मिळाले ना जागेची अधिकृत मालकी मिळाली. त्यामुळे त्यांना बँकांकडून गृहकर्ज देखील घेता येत नव्हते. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने मोठा निर्णय घेतला आणि नोटरीवर जागा घेतलेल्यांना मोठा दिलासा दिला.

अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत.25000 reward for accident help

दुसरीकडे अनेकांनी २०- २५ वर्षांपूर्वी काही गुंठे जागा घेऊन ठेवली, पण आता अडचणी असताना देखील त्यांना गुंठेवारीला परवानगी नसल्याने विकता येत नव्हती. त्यांना देखील या निर्णयामुळे गुंठ्यांची विक्री करता येणार आहे. नोटरी केलेल्यांना खरेदीपूर्वी जागेच्या मूल्याकंनानुसार (चालू बाजारभावाप्रमाणे) स्टॅम्प ड्युटी आणि मुद्रांक शुल्कावर नोटरी केलेल्या दिवसापासून दरमहा दोन टक्के दंड, अशी रक्कम जिल्ह्याच्या मुद्रांक शुल्क कार्यालयात भरावे लागेल. त्यानंतर ती जागा मुद्रांकित होईल आणि मग त्याची खरेदी करता येणार आहे.

पूर्वीच्या गुंठ्याची खरेदी अशी…

एखाद्याने पूर्वीच दोन-चार गुंठे जागा खरेदी केली आहे, पण त्याला गुंठेवारीस परवानगी नसल्याने विकता आली नाही. त्या व्यक्तीस आता त्या गुंठ्याची थेट खरेदी-विक्री करता येणार आहे. त्यासाठी त्या जागेचा सातबारा उतारा, आठ-अ, सहा-ड आणि जागेचा झोन नकाशा, अशी कागदपत्रे द्यावी लागणार आहेत. दुय्यम निबंधक कार्यालयात जागेच्या मूल्यांकनाच्या प्रमाणात स्टॅम्प ड्युटी भरून गुंठ्याची विक्री करु शकतो.

अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत.25000 reward for accident help

नोटरी केलेल्यांना करता येणार गुंठ्यांची खरेदी

राज्याच्या महसूल विभागाच्या निर्णयानुसार १९६५ ते १५ ऑक्टोबर २०२४ या काळातील शहरांच्या हद्दीतील गुंठ्यांचे व्यवहार नियमित होणार आहेत. त्यासाठी त्यांना स्टॅम्प ड्युटी, मुद्रांक शुल्कावरील दंड भरून घ्यावा लागेल. त्यानंतर संबंधितास त्या गुंठ्याच्या खरेदीस परवानगी मिळेल. पण, आता कोणी त्याच्या जमिनीचे गुंठे विकणार असेल तर त्यांना परवानगी नाही.

अनिकेत बनसोडे, जिल्हा मुद्रांक शुल्क अधिकारी, सोलापूर

कॉलेजच्या तरुणीने फेअरवेलमध्ये साडी नेसून केला भन्नाट डान्स, व्हिडिओ होतोय तुफान viral | Dance viral video

Leave a Comment