Navri Dance Viral Video: सोशल मीडिया सध्याच्या घडीचे प्रत्येक वयोगटातील व्यक्तींचे मनोरंजन करणारे माध्यम झाले आहे. त्यावर विविध विषयांवरील माहितीपासून ते विविध घटनांचे चांगले-वाईट व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. यातील काही व्हिडीओ आपल्या काळजाचा थरकाप उडवतात; तर काही व्हिडीओ आपले मनोरंजन करतात. परंतु यातील काही मोजके व्हिडीओ खूप चर्चेत येतात. अनेकदा चर्चेत आलेल्या व्हिडीओमधील कलाकरांना यामुळे खूप प्रसिद्धी मिळते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यातील एक नववधू खूप भन्नाट डान्स करताना दिसतेय.
लावणी नृत्य ही महाराष्ट्राची लोककला आहे. गावाच्या जत्रेतून पिढ्यापिढ्या मनोरंजन करणारी लावणी आजही लोकांच्या पंसतीस उतरते. लावणी ही वाटते तितके सोपे नाही. लावणी करण्यासाठी नृत्याची जाण तर लागतेच त्याचबरोबर नृत्य करण्यासाठी अदाही लागते.
ढोलकीच्या तालावर आणि घुंगराच्या बोलावर एकापेक्षा एक लावणी सादर करणाऱ्या कलाकारांचे अनेक व्हिडिओ रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात पण मोजकेच व्हिडिओ असतात जे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. आताही असाच एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असून सोशल मीडियावर लग्नातील हटके रील्स, व्हिडीओ आणि फोटो सतत व्हायरल होत असतात. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये लग्नातील अनेक गमतीजमती, अनोख्या प्रथा, हटके उखाणे आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक भन्नाट व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात एक नवरी तिच्या मेहंदीच्या कार्यक्रमात डान्स करताना दिसतेय.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक नववधू तिच्या मेहंदीच्या कार्यक्रमात ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ या गाण्यावर लावणी सादर करताना दिसतेय. यावेळी तिच्या हाताला आणि पायांनी मेहंदी लावल्याचे दिसत आहे. नववधूचा मनमोहक लावणीने आणि चेहऱ्यावरचे हावभावाने तिने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.