महाराष्ट्र राज्य नगरपरिषद मध्ये गट क व ड संवर्गातील 3720 रिक्त पदांची मेगा भरती! Maharashtra Nagarparishd Bharti 2026

Maharashtra Nagarparishd Bharti 2026:महाराष्ट्र शासनामार्फत १५० दिवसांचा (६ में,२०२५ ते २ ऑक्टोंबर, २०२५) कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सदर कार्यक्रमांतर्गत सरळसेवा पदभरती हा कार्यक्रम देखील राबविण्यात येत आहे. शासनाकडून राज्यातील सर्व प्रशासकीय विभागामधील आस्थापनेवरील एकूण ७५००० पदे सरळसेवेने भरणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक प्रानिमं-१२२२/प्रक्र.५४/का-१३अ दि.४ मे, २०२२ नुसार भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील गट- ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरणेबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना निर्गमित करणेत आल्या असून जिल्हास्तरीय पदे भरणेसाठी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती गठीत करणेत आली आहे.

राज्यात ‘या’ प्रकारातील लाभार्थ्यांचे रेशनकार्ड होणार आता रद्द; पुरवठा विभागाची नवी मोहीम सुरु. Ration Card News

वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक पदनि/२०२२/आपूका. दिनांक ३१/१०/२०२२ नुसार पदभरतीसाठी शिथिलता लागू करणेत आली असून सरळसेवा पदभरती प्रक्रिया दिनांक १५.०८.२०२३ पर्यंत पूर्ण करावयाची आहे, असे नमूद केले आहे.

तसेच सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक प्रानिमं-१२२२/प्रक्र.१३६/का-१३अ दि.२१ नॉव्होबर, २०२२ नुसार भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील गट व (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोटयातील पदे सरळसेवेने भरणेसाठी शासनाने स्पर्धा परीक्षा प्रक्रिया टि.सी.एस.-आयओ. एन (टाटा कन्सल्टन्सी सव्हिसेस लिमिटेड) व आय.बी.पी.एस. (इंस्टीट्यूट ऑफ बैंकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या कंपन्यांची निवड केली आहे. उक्त शासन निर्णयातील तरतूदीप्रमाणे सर्व जिल्हाधिकारी यांनी त्यांचे स्तरावर वरील दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपनीची निवड करावी, असे नमूद करणेत आले आहे.

संदर्भीय पत्र क्र.४ अन्वये सरळसेवेद्वारे गट-क व गट-ड च्या विविध संवर्गातील स्थायी रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया राबविणेबाबत सूचना देण्यात आल्या असून सरळसेवा पदभरतीबाबत रुपरेषा /वेळापत्रक ठरवून देण्यात आली आहे. याबाबत संचालनालय स्तरावरुन दृकश्राव्य प्रणालीद्वारे वारंवार आढावा घेऊन भरतीप्रक्रिया राबविणेबाबत सूचना / मार्गदर्शन करणेत आले आहे. परंतू आपल्या कार्यालयाकडून सरळसेवा पदभरती प्रक्रिया राबविणेबाबत शासनाकडून निवडण्यात आलेल्या कंपनीशी सामंजस्य करार करणेत आलेला नाही वा जाहिरात प्रसिध्द करणेत आलेले नाही, असे संचालनालयाच्या निदर्शनास आले आहे.

सबब, संदर्भ क्र.५ च्या पत्राद्वारे सदर कार्यक्रमांतर्गत्त सरळसेवा पदभरती हा कार्यक्रम देखील राबविण्यात येत आहे. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण स्वता जातीने लक्ष देऊन नगरपरिषदा/नगरपंचायतीमधील गट-क व गट-ड च्या स्थायी रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया राबविणेबाबत सरळसेवेने भरावयाच्या पदसंख्या निश्चित करून घेऊन तसेच प्रचलित शासन धोरणानुसार विहित पद्धतीने मागासवर्गीय कक्षाकडून आरक्षण निश्चित करण्याबाबत संबंधित नगरपरिषद/नगरपंचायती यांनी कार्यवाही करणे अपेक्षित आहे.

उक्त दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपनीची निवड करावी व त्यांचेसमवेत सामंजस्य करार तात्काळ करून, कार्यक्रम रूपरेषा / वेळापत्रक तयार करून जाहिरात प्रसिध्द करण्याबाबत कळविण्यात आले होते. परंतु त्यानुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल संचालनालयास अद्याप प्राप्त झालेला नाही. याबाबत मा. सह आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली दि.१२.०१.२०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता आढावा बैठक दृकश्राव्य (V.C.) माध्यमाद्वारे आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकीस आवश्यक माहितीसह व्यक्तिशः उपस्थित रहावे.

व्ही.सी. लिंक: https://meet.google.com/vfe-givi-xhq

मा. सह आयुक्त यांच्या मान्यतेने,

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment