Ladki Bahin Yojana E KYC:मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. जिल्ह्यातील तब्बल ५० हजार ४८४ महिलांच्या अर्जामध्ये तांत्रिक चुका आणि केवायसी प्रक्रियेत त्रुटी आढळल्या आहेत. या महिलांची पात्रता निश्चित करण्यासाठी आता अंगणवाडी सेविका त्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी करणार आहेत. योजनेसाठी ऑनलाइन अर्ज भरताना अनेक महिलांनी तांत्रिक माहिती भरताना चुका केल्या आहेत.
केवायसी करताना काही महिलांनी चुकीचे पर्याय निवडल्याने त्यांचे अर्ज संशयास्पद किंवा त्रुटीयुक्त दिसत आहेत. ही बाब शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर, पात्र महिलांना योजनेपासून वंचित राहू नये आणि अपात्र व्यक्तींना लाभ मिळू नये, म्हणून हा निर्णय घेतला.
केवायसी चुकलेल्या बहिणींना दिलासा
ज्या महिलांनी केवायसी करताना नजरचुकीने चुकीचे पर्याय निवडले होते, त्यांचे अर्ज ‘पेंडिंग’ किंवा ‘रिजेक्ट’ श्रेणीत गेले होते. आता अंगणवाडी सेविका स्वतः माहिती दुरुस्त करून घेणार आहे.
अंगणवाडी सेविका प्रत्यक्ष पडताळणी करणार
आता महिलांना महा-ई-सेवा केंद्र किंवा सेतू कार्यालयात चकरा मारण्याची गरज नाही. अंगणवाडी सेविका त्यांच्या कार्यक्षेत्रातील लाभार्थी महिलांच्या घरी जाऊन अर्जातील माहिती आणि प्रत्यक्ष स्थितीची खातरजमा करतील. पडताळणी दरम्यान प्रामुख्याने अर्जातील उत्पन्न गट आणि प्रत्यक्ष उत्पन्नाचा दाखला. वैवाहिक स्थिती (विवाहित, विधवा, परित्यक्ता आदी) आधार कार्डशी लिंक असलेला मोबाइल क्रमांक, रहिवासी पुरावा आणि बँकेचे खाते सक्रिय आहे का? याची तपासणी केली जाणार आहे.
नोव्हेंबर-डिसेंबरचे हप्ते अडकले
ज्या महिलांच्या अर्जात केवायसीच्या त्रुटी आहेत, अशा अनेक लाभार्थीचे 3 नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते अद्याप जमा झालेले नाहीत. या पडताळणीनंतर पात्र ठरणाऱ्या महिलांचे हे प्रलंबित हप्ते एकत्रितपणे खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
आता जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये अंगणवाडी सेविका प्रत्यक्ष घरोघरी जाऊन पडताळणी करणार असल्याने यातून ज्यांना पैसे मिळाले नाही त्यांना या पडताळणीनंतर हप्ते मिळण्यास सुरुवात होणार आहे.
जिल्ह्यातील महिलांनी केले निर्णयाचे स्वागत
शासनाच्या निर्णयामुळे कोणावरही अन्याय होणार नाही आणि महा ई-सेवा केंद्र किंवा सेतू कार्यालयाच्या चकरा माराव्या लागणार नाही. त्यामुळे महिलांनी शासन निर्णयाचे स्वागत केले आहे.
आधार
आधार प्रमाणीकरण
सत्यापित करा
या प्रश्नांमुळे झाला होता गोंधळ
अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
केवायसी करताना विचारण्यात आलेल्या प्रश्नांच्या उत्तरात गोंधळ झाला होता. उदा. ‘तुम्ही सरकारी नोकरीत आहात का?’ किंवा ‘उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे का?’ या प्रश्नांना ‘हो’ किंवा ‘नाही’ म्हणताना अनेक महिलांनी चुकीचे बटण दाबले होते, ज्यामुळे त्या अपात्र ठरल्या होत्या. आता पडताळणी त्या गोष्टी स्पष्ट होऊन कोणावरही अन्याय होणार नाही.
जिल्ह्यात ५० हजार महिलांना फटका
जिल्ह्यात ५१ हजार ४८४ महिलांच्या अर्जामध्ये तांत्रिक त्रुटी आढळल्या आहेत. यात चार टप्प्यांत वर्गीकरण करण्यात आले आहे. ६५ पेक्षा अधिक वय असल्याचे ५ हजार ५२४, २१ वयापेक्षा कमी असलेले २ हजार ४२२, तर चुकीचा पर्याय निवडणारे तब्बल ४१ हजार ८२७ इतकी आहे. शिवाय, लिंग चुकीचे निवड केल्याने ७११ महिलांचा समावेश आहे. इतक्या मोठ्या संख्येने महिलांचे हप्ते रखडल्याने ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण होते. आता ही पडताळणी मोहीम या सर्व महिलांसाठी आशेचा किरण ठरली आहे. या निर्णयाचा जिल्ह्यातील महिलांनी स्वागत केले आहे.
पात्र महिलांना जि. प. मतदानापूर्वी मिळणार हप्ता
जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे वारे वाहत असल्याने, मतदानापूर्वी या सर्व पात्र महिलांच्या खात्यात रखडलेले पैसे जमा करण्याचा सरकारचा मानस आहे. पडताळणी प्रक्रिया युद्धपातळीवर पूर्ण झाल्यास फेब्रुवारी महिन्यात हे पैसे खात्यात पडू शकतात.
जिल्ह्यातील ज्या ५०,४८४ अर्जामध्ये त्रुटी आहेत, त्यांची पडताळणी अंगणवाडी सेविकांमार्फत सुरू केली आहे. पात्र महिलांनी सेविकांना सहकार्य करावे. कोणाचेही हप्ते विनाकारण थांबवले जाणार नाहीत, तांत्रिक चुका दुरुस्त करणे हाच या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
– राजेंद्र भामरे, महिला व बालकल्याण अधिकारी, धुळे
नवीन महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा