Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी ! जानेवारी-फेब्रुवारीचे ₹३००० एकत्र येणार? वाचा सविस्तर
लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता लांबणीवर गेला आहे. लाडकी बहीण योजनेत जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे.
जानेवारी महिना संपला आहे तरीही लाडक्या बहिणींना हप्ता मिळालेला नाही. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात जानेवारीचा हप्ता कधी येणार याची वाट महिला पाहत आहेत. दरम्यान, जानेवारीसोबतच फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. लाडकी बहीण योजनेत महिलांना दोन्ही हप्ते एकत्र मिळणार का असा प्रश्नदेखील विचारला जात आहे.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता लांबणीवर (Ladki Bahin
योजनेच्या जानेवारीच्या हप्त्याला विलंब होऊ शकतो)
लाडकी बहीण योजनेत जानेवारीचा हप्ता लांबणीवर गेला आहे. फेब्रुवारी महिना सुरु झाला तरीही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, आता महिलांना जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येणार का असा प्रश्न विचारला जात आहे.
मागील अनेक दिवसांपासून जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या निवडणुकीपूर्वी महिलांच्या खात्यात जानेवारीचा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान, आता हा हप्ता आणखी पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचसोबत आता फेब्रुवारीच्या हप्त्याबाबतही प्रश्न विचारले जात आहे.
लाडकी बहीण योजनेत जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर जानेवारीचा हप्ता आणखी लांबणीवर गेला तर दोन्ही हप्त्याचे ३००० रुपये एकत्र येऊ शकतात. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.
महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा