Crop Insurance 2026:शेतकऱ्यांसाठी खुशखबर! रब्बी अनुदानाचे वाटप सुरू; ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार हेक्टरी १०,००० रुपये
प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा
खरीप हंगाम २०२५ मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या रब्बी अनुदानाच्या वाटपाला आता प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. अनेक जिल्ह्यांतील शेतकरी गेल्या काही काळापासून या अनुदानाच्या प्रतीक्षेत होते, त्यांची ही प्रतीक्षा आता संपली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
राज्यातील २८२ तालुके पात्र
राज्यातील एकूण २८२ तालुके हे अतिवृष्टीमुळे पूर्णतः किंवा अंशतः बाधित म्हणून जाहीर करण्यात आले होते. या तालुक्यातील महसूल मंडळांमधील बाधित शेतकऱ्यांसोबतच, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे कोकण आणि विदर्भातील ज्या जिल्ह्यांचे नुकसान झाले होते, त्यांनाही हे रब्बी अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या पात्र शेतकऱ्यांना आता त्यांच्या नुकसानीच्या प्रमाणानुसार भरपाई मिळत आहे.
महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नुकसान भरपाईचे स्वरूप आणि निकष
राज्य शासनाच्या निर्णयानुसार, बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी १०,००० रुपये या दराने रब्बी अनुदान दिले जात आहे. भरपाईचे गणित खालीलप्रमाणे असेल:
एक हेक्टर क्षेत्र बाधित असल्यास: १०,००० रुपये अनुदान मिळेल.
५० आर क्षेत्र बाधित असल्यास: ५,००० रुपये अनुदान मिळेल. थोडक्यात, शेतकऱ्याच्या नावावर जेवढे बाधित क्षेत्र नोंदवले गेले आहे, त्या प्रमाणानुसार ही रक्कम थेट बँक खात्यात (DBT द्वारे) वितरित केली जात आहे.
अनुदान वितरणाला आजपासून सुरुवात
उर्वरित असलेल्या अतिवृष्टी अनुदानाचे वाटप २२ जानेवारीपासून सुरू झाले होते, त्यापाठोपाठ आता रब्बी अनुदानाचे वितरणही आजपासून सुरू झाले आहे. पुढील काही दिवसांत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल. ज्या शेतकऱ्यांना अनुदानाचे मेसेज प्राप्त झाले आहेत, त्यांनी इतर शेतकऱ्यांच्या माहितीसाठी कमेंटमध्ये कळवावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.