लाडक्या बहिणींना मोठा दिलासा थकित ४५०० रुपये एकाचवेळी खात्यात Ladki Bahin Yojana 4500 Insttalment

Ladki Bahin Yojana 4500 Insttalment:विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या या योजनेत राज्यातील महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. या योजनेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला असून, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा उपक्रम मानला जातो.

निवडणुकीत या योजनेचा महायुती सरकारला राजकीय लाभझाल्याचेही चित्र दिसून आले. मात्र, ई-केवायसी प्रक्रियेमुळे अनेक लाभार्थ्यांना नियोजित वेळेत हप्ते मिळाले नाहीत, त्यामुळे नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.

ई-केवायसी पूर्ण न झाल्यामुळे अनेक महिलांचे हप्ते थांबले

मुंबई – राज्यातील महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या लाडकी बहीण योजनेतील लाभार्थीना मोठा दिलासा देणारी माहिती महिला व बालविकास विभागाकडून समोर आली आहे. ई-केवायसी प्रक्रियेमुळे अनेक महिलांचे थकित राहिलेले तीन महिन्यांचे हप्ते आता एकत्रित स्वरूपात देण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे कळत आहे.

चुकीला माफी नाही या’ तारखेपासून HSRP नंबरप्लेट नसेल तर बसणार 10,000 रुपये दंड.Maharashtra HSRP Last Deadline 2026

होते. काही महिलांनी आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया पूर्ण करूनही त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते.

त्यामुळे महिलांनी संबंधित कार्यालयांमध्ये जाऊन नाराजी व्यक्त केली. काही ठिकाणी तर लाभार्थी महिला रस्त्यावर उतरून आंदोलन करतानाही दिसून आल्या. पैसे का येत नाहीत, याबाबत स्पष्टता नसल्याने महिलांमध्ये संभ्रम आणि असंतोष वाढत होता.

आठवा वेतन आयोग बाबत महत्वपुर्ण पत्र निर्गमित दि.03.02.2026. 8th Pay Commission

या पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण विभागाने संबंधित अधिकाऱ्यांना लाभार्थी महिलांच्या घरी जाऊन चौकशी करण्याचे आदेश दिले होते. नियम आणि अटी डावलून सादर झालेल्या अर्जाची पडताळणी सध्या सुरू आहे. यामुळे लाभार्थीची माहिती तपासून योग्य पात्र महिलांपर्यंत लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. या सर्व प्रक्रियेनंतर आता थकित हप्ते एकत्र देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

या निर्णयानुसार पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट ४५०० रुपये जमा केले जाणार आहेत. ज्यांचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचे हप्ते थकले होते, त्यांना जानेवारीसह एकत्रित रक्कम दिली जाईल. तर काही महिलांना यापूर्वीच दोन महिन्यांचे हप्ते मिळाले असल्यास, त्यांना जानेवारी महिन्याचा

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment