Ajit Pawar Plane Crash : अजितदादांच्या विमानाचा अपघात कशामुळे झाला? अपघाताचे कारण आले समोर, अहवालात धक्कादायक माहिती
Ajit Pawar Plane Crash : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतील येथे विमान अपघातात मृत्यू झाला. या अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामती येथे २८ जानेवारी रोजी अपघात झाला. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह ५ जणांचा मृत्यू झाला.
अपघातामागचे नेमके कारण अजूनही समजलेले नाही, अनेकांनी धुक्यांमुळे धावपट्टी दिसणी नसल्याचा दावा केला आहे. दरम्यान, आता या अपघाताचा एक प्राथमिक अहवाल आल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये धक्कादायक माहिती देण्यात आली आहे.
अजित पवार यांच्या विमानाचा अपघात हा फक्त तांत्रिक बिघाडामुळे झालेला नाही. या अपघाताला मानवी चुकाही कारणीभूत असल्याचे निरीक्षण प्राथमिक अहवालातून करण्यात आले आहे.
विमान लँडिंग करत असताना पायलटला धावपट्टीच्या अंतराचा आणि स्थितीचा अचूक अंदाज न आल्याने विमानाचा समतोल बिघडला असल्याचे या अहवालात म्हटले आहे. या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, अपघातानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने विमान अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. बारामतील विमानतळावर विमान लँडिंग होत असताना इंजिनमध्ये गंभीर बिघाड असावा यामुळेच पायलटचे विमानावरचे नियंत्रण सुटले असावे अंदाज व्यक्त केला आहे.
विमानाचे लँडिंग करत असताना पायलटचा लँडिंगचा अँगलच चुकला असल्याचे या अहवालात म्हटले आहे. हवामान किंवा तांत्रिक समस्यांमुळे पायलटला धावपट्टीची योग्य दिशा आणि उंची राखण्यात अचडणी आल्या होत्या.
यामुळेच विमान भरकटले. धावपट्टीचा अंदाज घेण्यात झालेली चूक विमानाची गती आणि इंधन स्थिती लक्षात घेता जीवघेणी ठरली असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
दरम्यान, आता विमानातील ब्लॅक बॉक्समधील माहिती याचे विश्लेषण यावरून अपघातामागचे कारण मिळू शकेल. विमानातील ब्लॅक बॉक्स सापडला आहे, यामधील माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. लवकरच हा अहवाल येऊ शकतो.
या अपघात प्रकरणी नवीन माहिती समोर येत आहेत. आमदार अमोल मिटकरी यांनी चौकशी करण्याची मागणी केली आहे. मिटकरी यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात ५ मृतदेहच का सापडले?, सहावी व्यक्ती कुठे गेली?, Take-off आधी प्रवासी यादी digitally नोंदलेली असते, मग विसंगती का?, एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही?, एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले? हे प्रश्न अमोल मिटकरी यांनी उपस्थित केले आहेत.