पती पत्नीसाठी पोस्ट ऑफिसमधील ही योजना फायद्याची, पाच वर्षात 13 लाखांची मिळकत |Post Office Scheme

Post Office Scheme:पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित मानली जाते. कोणत्याही जोखीमेशिवाय गुंतवणूक करण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. पोस्ट ऑफिसमध्ये राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र अर्थात एनएससी ही योजना आहे. ही एक सरकारी हमी योजना असून पाच वर्षांनी परिपक्व होते. यात निवृत्तिनंतरचे पैसे, जमीन विकून मिळालेले पैसे किंवा मोठी रक्कम गुंतवू शकता.

क्षणोक्षणी मृत्यू जवळ येत होता अन्…’ अचानक वाढले पाणी अन् काळू धबधब्याजवळ अडकले ३०० पर्यटक; थरारक Video Viral | Kalu waterfall rescue Viral Video

कारण यातून तुम्हाला व्याजाच्या रुपाने चांगला परतावा मिळणार हे निश्चित आहे. तुमचे पैसे या योजनेत पूर्णपणे सुरक्षित असतील. त्यामुळे पोस्ट ऑफिसमध्ये केवायसी आणि आवश्यक कागदपत्रं सादर करून तुम्ही खातं उघडू शकता.

या योजनेत कोणतीही व्यक्ती गुंतवणूक करू शकते. तुम्ही एकटे किंवा संयुक्तपणे खाते उघडू शकता. संयुक्त खात्यासाठी जास्तीत जास्त तीन प्रौढ व्यक्ती सहभागी होऊ शकतात. 10 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची मुलंही स्वत:चं खातं उघडू शकतात.

मूल लहान असेल किंवा एखादी व्यक्ती मानसिकदृष्ट्या आजारी असेल तर पालक त्याच्या नावावर खाते उघडू शकतात. तुम्हाला हवं असल्यातं कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला नॉमिनी ठेवू शकात. या योजनेत तुम्ही हवी तितकी खाती उघडू शकता.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात तु्म्ही किमान 1000 रुपये आणि जास्तीत जास्त कितीही गुंतवणूक करू शकता. यात केलेल्या गुंतवणुकीत तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्क सवलत देखील मिळते.

तुम्हाला एका वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम करमुक्त असणार आहे. सध्या या योजनेत वर्षाला 7.7 टक्के व्याज मिळते. हे व्याज चक्रवाढीसह वाढतच जाते. व्याजाची रक्कम 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच मिळते. पहिल्या चार वर्षांचे व्याज पुन्हा गुंतवले जाते. त्या व्याजावरही सूट आहे. पण पाच वर्षांच्या व्याज करपात्र आहे.

पती पत्नी नोकरी करत असतील तर त्यांनी संयुक्तपणे हे खाते उघडू शकातत. दोघांनी मिळून या खात्यात 9 लाख रुपये गुंतवले तर तुम्हा पाच वर्षांनी 13 लाख 4 हजार 130 रुपये मिळतील. यात 4 लाख 4 हजार 130 रुपये व्याजाच्या स्वरुपात असतील.

महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment