मेघगर्जना, वादळी वारे अन् पावसाचा मारा; पुढच्या 24 तासांत संकटाची शक्य ती सर्व रुपं दिसणार… शाळांना सुट्टी जाहीर Maharashtra Weather News

Maharashtra Weather News : हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्याच्या बहुतांश भागांमध्ये मागील 48 तासांत पावसानं जोरदार हजेरी लावली आणि मुंबईपासून ते अगदी कोकणापर्यंत सर्वत्रच या पावसानं जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. ठाणे, रत्नागिरी, रायगडमध्ये पावसानं लावलेल्या हजेरीमुळं वाहतुकीवर परिणाम झालेच तर, नद्यांनी इशारा पातळी ओलांडल्यामुळंसुद्धा बहुतांश गावांना सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला.

आशिया कप 2025 साठी टीम इंडियाची घोषणा! सूर्या करणार नेतृत्व; शुभमन गिल उपकर्णधार, जाणून घ्या संपूर्ण संघ BCCI Announces Team India Squad for Asia Cup 2025

मुंबई शहर आणि उपनगरात झालेल्या पावसानं पुन्हा एकदा 26 जुलैची आठवण करून दिली. इथं संकटांचा डोंगर मोठा होत असतानात मंगळवारी सायंकाळनंतर मुंबईच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचं पाहायला मिळालं. तर, उपनगरांत पावसाची संततधार असल्याचं पाहायला मिळालं. ठाणे कल्याण, डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर परिसरात मुसळधार पाऊस सुरूच असल्याचं स्पष्ट होत आहे.

पुढच्या 24 तासाच पावसाळी नाटकाचा नवा अंक… मेघगर्जना आणि…

पावसाची कधीही न पाहिलेली रुपं गेल्या 24 तासांमध्ये पाहायला मिळाली आणि हे सत्र राज्यात पुढील 24 तासांसाठी सुरूच राहणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रामध्ये कमी दाबाता पट्टा सक्रिय असल्या कारणानं राज्यात पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. परिणामस्वरुप महाराष्ट्रासह गोवा आणि कर्नाटकापर्यंत पावसाचा जबर मारा पाहायला मिळत आहे.

पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड या पाच जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर दुसरीकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली या जिल्ह्यासह कोल्हापूर घाट क्षेत्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, आयएमडीनं वर्तवलेल्या अतिवृष्टीच्या अंदाजानुसार आपत्कालीन परिस्थितीत सर्व जिल्हा प्रशासनांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विदर्भ मराठवाड्यासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मान्सूनसाठी पोषक वातावरण असल्यानं मोसमी पावसाळी वाऱ्यांचे प्रवाह आणखी तीव्र होत असून, मुंबईपासून सातारा, कोल्हापूर, पुण्यातील घाटमाथ्यावर पावसाचा तडाखा कायम राहणार आहे.

शेतकरी योजनांचा फायदा आता सर्व शेतकऱ्यांना मिळणार; लाभार्थी निवडीसाठी नवीन धोरण लागू Farmer’s Government Schemes

काय आहे मुंबई लोकलची स्थिती?

बुधवारी पहाटेपासून मुंबईत पावसाची संततधार असून, तूर्तास शहरात पाणी साचल्याचे प्रकार समोर आले नाहीत. हार्बर , मध्य आणि पश्चिम लोकल सेवा काही मिनिटांच्या फरकाने धावत आहे. तर, रस्ते वाहतुकही सुरळीत सुरू आहे.

 

Leave a Comment