असा डान्स याआधी कधीच पाहिला नसेल…’, शिक्षकाचा विद्यार्थिनींबरोबर भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स | Teacher Dance Viral Video

Teacher Dance Viral Video: हल्लीच्या शालेय शिक्षण पद्धतीत आणि पूर्वीच्या शालेय शिक्षण पद्धतीत खूप मोठा फरक पाहायला मिळतो. शिक्षणच नव्हे, तर शिक्षक आणि त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतींमध्येही बदल झालेले पाहायला मिळतात.

पूर्वीचे शिक्षक एखादी गोष्ट समजावून सांगताना विद्यार्थ्यांना मारणे, शिक्षा देणे या पद्धतींचा अवलंब करायचे. परंतु, आताचे शिक्षक विद्यार्थ्यांच्या कलाने घेत, त्यांना नवनवीन गोष्टी शिकवतात.

अर्थात, पूर्वीच्या शिक्षणात केवळ मुलांनी अभ्यास करून यश मिळवावं हाच हेतू असायचा. परंतु, बदलत्या काळानुसार आता शाळेत मुलांचे छंद, कला, आवड-निवड या सर्व गोष्टींकडेही लक्ष दिले जाते. मुलांना काय आवडतं त्यानुसार शिक्षक आपल्या शिकवण्याच्या पद्धतीत बदल करतात. शिवाय अनेकदा शिक्षकही वर्गातील विद्यार्थ्यांबरोबर नाचताना, गाणी गाताना दिसतात.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

हल्ली समाजमाध्यमांवर शाळा किंवा कॉलेजमधील शिक्षकांचे शाळेत शिकवतानाचे काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता शाळेतील असा एक व्हिडीओ सध्या खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात शिक्षक काही विद्यार्थिनींबरोबर सुंदर डान्स करताना दिसतोय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वर्गामध्ये काही विद्यार्थिनी डान्स करत असून यावेळी त्यांचे शिक्षक तिथे येतात आणि त्यांच्याबरोबर डान्स करायला सुरुवात करतात. यावेळी शिक्षक विद्यार्थिनींसह ताल से ताल मिला या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. शिक्षकाचा सुंदर डान्स सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. अनेक नेटकरी या डान्सचे कौतुक करताना दिसत आहेत.

हा सोशल मीडियावर खूप चर्चेत असलेला व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @dubailife814 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला सात लाखांहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक नेटकरी यावर विविध कमेंट्स करताना दिसत आहेत.

Leave a Comment