Ajit dada Pawar Death Viral Video:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भात विमान अपघाताची माहिती समोर आल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना बारामती येथील विमानतळावर लँडिंगच्या वेळी घडल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लँडिंगदरम्यान विमान तांत्रिक कारणामुळे धावपट्टीवरून बाजूला गेल्याची माहिती मिळत आहे. यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
मित्राबरोबर अनैतिक संबंधांच्या संशयातून महिलेचा खून. Crime Report News
दादा पर्वाच्या राजकारणाचा अकाली अस्त
अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये अजित पवारांसह जखमींना बारामतीमध्येच उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे अजित पवार यांच्या दादा पर्वाच्या राजकारणाचा अकाली अस्त झाला आहे. राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या साडेचार दशकांपासून अजित पवार नावाचं वारं सातत्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेत असायचे.
राजांच्या राज्याच्या राजकारणामध्ये त्यांची धडाडी, राष्ट्रवादीचे एकहाती नेतृत्व आणि शरद पवारांचे वारसदार म्हणून अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाहिलं जात होतं. मात्र, अजित पवार यांच्या अकाली जाण्याने पवार कुटुंबीयांसह अवघ्या राज्याला मुळापासून हादरा बसला आहे. अपघातग्रस्त विमान पाहिल्यानंतर अनेकांना जागेवर अश्रु अनावर झाले.
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार अपघाताचे धक्कादायक व्हिडिओ व्हायरल.Ajit dada Pawar Death Viral Video