महत्त्वाची बातमी व्हॉट्सअॅपवरील एपीके फाइल ठरली घातक; व्यावसायिकाने १ तासात गमावले ९ लाख रु. APK Files Scam

APK Files Scam:व्हॉट्‌सअॅप मेसेजवर विविध शासकीय योजना, आरटीओ चालानच्या नावाने एपीके फाइल पाठवून मोबाइल हॅक करण्याच्या घटना अद्यापही सुरू आहेत.

छावणीतील एका मेडिकल व्यावसायिकाने ‘आरटीओ चालान’ नावाची एपीके फाइल इंस्टॉल करताच क्षणात मोबाइल हॅक झाला. पुढे काही तासांत सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या मोबाइल बँक अॅपचा ताबा घेत ९ लाख रुपये हडपले. मंगळवारी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

VIDEO: “एक नंबर तुझी कंबर…” काकूंच्या डान्सपुढं तरुणीही फिकी पडली; खतरनाक डान्सची संपूर्ण सोशल मीडियावर चर्चा.Viral video

वैद्यकीय शेख व्यावसायिक वसीमोद्दीन यांना १५ जुलै रोजी ‘रिजास हेल्थ केअर’ या व्हॉट्सअॅप ग्रुपवर ‘आरटीओ चालान ५०० रुपये’ या नावाने मेसेज आला. हा एपीके फॉरमॅटमधील मेसेज होता. वसीमोद्दीन

APK म्हणजे काय?

अँड्रॉइड पॅकेज किट म्हणजे एपीके (Apk) ओळखले जाते. हे अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमद्वारे अॅप्लिकेशन्स इंस्टॉल करण्यासाठीची फाइल असते. प्ले स्टोअर किंवा अॅपल स्टोअरवर खात्रीशीर अॅप्स असतात. मात्र, थेट लिंक, टेलिग्राम, व्हॉटसअॅप ग्रुपवर आलेल्या अशा APK फॉरमॅटमधील फाइल्स धोकादायक असतात.

१९३० या नंबरवर त्वरित फोन केल्यास पैसे परत मिळू शकतात

यांनी क्लिक करताच फोन हॅक झाला. अनेक ओटीपी येण्यास सुरुवात झाली. त्यांनी नेट बँकिंगद्वारे खाते गोठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या बँकेचे सर्व पासवर्ड बदलून येस बँक खात्यातून २ लाख रुपये वळते केले.

PM किसान 20वा हप्ता जुलैला नाही! आता या दिवशी येणार थेट ₹2000 खात्यात! PM Kisan Yojana Insttalment Update

वसीमोद्दीन यांनी बँकेत धाव घेतली. तोपर्यंत दोन टप्प्यांत सात लाख रुपये कपात झाले होते. त्याशिवाय सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या एचडीएफसी बैंक खात्यावरील बचत खात्यावर ३ लाख ४५ हजारांचे जंबो लोन घेतले.

काय आहे हा स्कॅम?

आधी शासकीय योजनांच्या नावाने एपीके फाइल्स फॉरवर्ड होत होत्या. सध्या ‘आरटीओ चालान’ नावाने होत आहे. ती इंस्टॉल करताच गुन्हेगार तुमच्या मोबाइलचा ताबा मिळवतात.

नेमके काय होते ?

एपीके अॅपवर क्लिक करताच हिडन अॅप इंस्टॉल होऊन (मोबाइलमध्ये दिसत नाही) बॅकग्राउंडला सुरू करते.

तुम्ही मोबाइलमध्ये जे काही करता, ते सायबर गुन्हेगारांना दिसते. बँक अॅप उघडताच ते त्याचाही ताबा मिळवतात.

तुमचे सर्व मेसेज, कॉल एका विशिष्ट नंबरला ऑटो फॉरवर्ड होतात.

हे अवश्य करा

व्हॉट्सअॅपचे ऑटो डाउनलोड मोड कायम बंद ठेवा.

अनोळखी अॅप इंस्टॉल झाल्यास पहिले फ्लाइट मोड ऑन करा. त्यानंतर डिव्हाइस फॅक्टरी रिसेट करा.

तत्काळ १९३० क्रमांकावर तक्रार नोंदवा.

August 2025 School Holidays Calender | ऑगस्ट महिन्यात मुलांची मजा! इतके दिवस असणार शाळांना सुट्टी

Leave a Comment