Board Exam Question Paper:मित्रांनो खालील बटणांवर क्लिक करून तुम्ही इयत्ता बारावी मराठी (युवकभारती) विषयाच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता.
बारावीच्या कृतिपत्रिकेतील घटकनिहाय गुणविभागणी लक्षात घ्या:
गद्य: २० गुण
पद्य: १६ गुण
साहित्यप्रकार – कथा: १० गुण
उपयोजित लेखन: १४ गुण
व्याकरण व लेखन: २० गुण
एकूण: ८० गुण
३. पाठ्यपुस्तकातील सर्व पाठ परत एकदा एकाग्रतेने वाचून घ्या.
४. उताऱ्यातील छोट्या छोट्या तपशिलांकडे बारकाईने लक्ष द्या; जेणेकरून आकलनाच्या कृती तुम्ही सहजगत्या सोडवू शकाल. स्वमत कृतीत आपले मत मांडताना त्याची मांडणी मुद्देसूद करा आणि स्वतःच्या शब्दांत स्वतःचे मत मांडा.
५. प्रत्येक पाठावरील स्वमत आणि अभिव्यक्ती कृतींच्या उत्तरांतील महत्त्वाचे मुद्दे एका स्वतंत्र वहीत लिहून काढा.
६. विविध सराव कृतींची उत्तरे मनःपूर्वक वाचा. तुम्ही स्वतःदेखील मुद्दे काढलेले असल्याने ही उत्तरे तुम्हांला नीट कळतीलच; त्याचबरोबर ती लक्षात ठेवणेही आपोआप सुलभ बनेल.
७. कविता जितक्या तोंडपाठ असतील तितक्या चांगल्या! मार्गदर्शकाच्या साहाय्याने प्रत्येक कवितेचा संपूर्ण भावार्थ समजून घ्या. भावार्थ पूर्णपणे कळलेला असल्यास उत्तर लेखन अधिक सहज आणि सुलभ होईल.
८. ‘साहित्यप्रकार – कथा’ यामधील कृतींच्या उत्तरांची रचना लक्षात घ्या. उत्तराची सुरुवात, मध्य आणि शेवट कसा आहे तसेच मुद्द्यांचा क्रम कसा लावला आहे, याकडे विशेष लक्ष द्या.
९. व्याकरणातील कृती या पैकीच्या पैकी गुण मिळवून देणाऱ्या कृती असतात. व्याकरण आणि उपयोजित लेखनासाठी पुरेसे मार्गदर्शन घेऊन विविध स्वाध्यायांचा नियमित सराव करा.
जुलै 2023 प्रश्न संच पत्रिका
जुलै 2024 बोर्ड परीक्षा प्रश्नपत्रिका
जुलै 2025 बोर्ड परीक्षा प्रश्नपत्रिका pdf