Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Recruitment:महानगरपालिकेत विविध पदांसाठी २२७ जागा भरण्यात येणार आहेत. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात जाहिरात निघेल, अशी माहिती प्रशासकीय यंत्रणांकडून देण्यात आली आहे.
महापालिकेसाठी शासनाने मंजूर केलेल्या आकृतिबंधानुसार मंजूर पदांची संख्या ५२०२ एवढी आहे. २४०० कर्मचारी कार्यरत असून २८०० हून अधिक पदे रिक्त आहेत.
गतवर्षी यातील १२४ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. आता या भरतीतील उर्वरित जागा आणि नव्याने विविध १२ पदांच्या २७२ जागांसाठी महापालिका निवडणुकीपूर्वी भरती प्रक्रिया राबविली जाणार होती.
परंतु लिपिकांची ५० पदे वगळून महापालिकेने २२७पदांसाठी जाहिरात प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यापूर्वीच महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या. या निवडणुकानंतर भरती प्रक्रिया राबविली जाईल, असे
CIBIL Score कमी असला तरी; पण मिळवा 5 लाख रुपये कर्ज CIBIL SCORE Loan
या जागांसाठी होणार भरती प्रक्रिया
रोखपाल १२, उद्यान सहायक ९, अनुरेखक ९, चालक यंत्रचालक १७, सहायक सुरक्षा अधिकारी १, उपअग्नशिमन केंद्र अधिकारी-४, कनिष्ठ अभियंता स्थापत्य ३२, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक २४, स्वच्छता निरीक्षक १२, अग्निशामक १००, पशुधन ७. प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.
महापालिका निवडणुकीची आचारसंहिता संपण्यापूर्वीच निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदच्या निवडणुका जाहीर केल्या. त्यामुळे या निवडणुकांमध्ये भरतीची जाहिरात काढण्यासाठी महापालिकेने परवानगी आयोगाकडे मागितली.
जि.प. निवडणुकीनंतर जाहिरात काढावी, असे आदेश महापालिकेला दिले आहेत. त्यामुळे आणखी दोन आठवड्यानंतरच भरतीची जाहिरात निघेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा