शेतकऱ्यांना मिळालेल्या मदत मधुन कर्ज वसुली करता येणार नाही.नवीन शासन पत्रक जारी Crop Insurance Update 2025

Crop Insurance Update 2025:उपरोक्त विषयाच्या संदर्भीय शासन पत्राकडे आपले लक्ष वेधण्यात येत असुन त्याचे अवलोकन प्रस्तुत प्रकरणी शासनामार्फत विविध योजनांचे आर्थिक लाभ संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे देण्यात येतात.

तथापि असा लाभ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाल्यानंतर काही बँका सदर लाभाच्या रकमेतून शेतकऱ्यांच्या कर्जाची थकबाकी वसूली करत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. शासनामार्फत राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानापोटी तसेच शेतकऱ्यांच्या कल्याणाकरीता आर्थिक मदत देण्यात येत असल्यामुळे सदर मदत / लाभाचा उपयोग शेतकऱ्यांना होणे अपेक्षीत आहे.

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

या अनुषंगाने आपणांस सुचित करण्यात येते की, शासनाकडुन शेतकऱ्यांना विविध योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या मदतीच्या रक्कमेतुन बँकेच्या कर्जाची वसूली न करणेबाबतच्या सुचना राज्यस्तरीय बैंकर्स समिती यांनी आपल्या सदस्य बँकांना द्याव्यात. तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी शासन पत्राप्रमाणे योग्य ती कार्यवाही करावी.

या माणसाने पाणी गरम करण्यासाठी अद्भुत जुगाड केला, व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही मान्य कराल की भारतीयांचे मन किती तीक्ष्ण आहे Water Heater Jugad Video

Leave a Comment