कोणाची कर्जमाफी होणार, जाणून घ्या माहिती गोळा करण्याची प्रक्रिया आणि महत्त्वाच्या अटी.Farmer’s Loan Waiver Update 2026

Farmer’s Loan Waiver Update 2026:कोणाची कर्जमाफी होणार, जाणून घ्या माहिती गोळा करण्याची प्रक्रिया आणि महत्त्वाच्या अटी

राज्य शासनाने ३० ऑक्टोबर २०२५ रोजी राज्यातील कर्जबाजारी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी एका विशेष समितीची स्थापना केली होती. या समितीमार्फत आता कर्जमाफीच्या प्रक्रियेला वेग आला असून राज्यातील थकीत कर्जदार आणि नियमित कर्ज परतफेड करणारे अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यवतमाळ, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि अहिल्यानगर यांसारख्या जिल्ह्यांतील मध्यवर्ती सहकारी बँकांनी आपल्या सभासद शेतकऱ्यांचा डेटा जमा करण्यास सुरुवात केली आहे.

12 जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा! नवीन हवामान अंदाज जाहीर.IMD Rain Alert

कर्जमाफीसाठी पात्र ठरण्यासाठी सरकारने काही कडक निकष आणि तांत्रिक प्रक्रिया अनिवार्य केल्या आहेत. ‘महायटी’च्या (MahaIT) माध्यमातून एक नवीन पोर्टल विकसित केले जात असून, त्यामध्ये शेतकऱ्यांचा ‘ॲग्री स्टॅक’ (AgriStack) आणि आधार डेटा लिंक केला जाणार आहे. याद्वारे शेतकऱ्याचे एकूण उत्पन्न, जमिनीचे क्षेत्र, पूर्वी मिळालेली कर्जमाफी आणि ‘ई-पीक पाहणी’मधील नोंदी या सर्वांचा सखोल अभ्यास केला जाईल. ज्या शेतकऱ्यांचे कर्ज गेल्या ३ ते ४ वर्षांपासून थकीत आहे, त्यांना या योजनेत प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे, मात्र नियमित कर्जदारांसाठीही प्रोत्साहनपर योजनेचा विचार सुरू आहे.

शेतकऱ्यांनी या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आपल्या संबंधित विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांकडे काही महत्त्वाची कागदपत्रे तातडीने जमा करणे आवश्यक आहे. यामध्ये आधार कार्ड, बँक पासबुकची प्रत, मोबाईल नंबर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘फार्मर आयडी’ (Farmer ID) यांचा समावेश आहे. फार्मर आयडी आणि ई-पीक पाहणीशिवाय कर्जमाफीचा लाभ मिळणे कठीण होणार आहे, कारण या तांत्रिक नोंदींशिवाय बँक खाते आणि शेतीची माहिती संलग्नीत करता येणार नाही. जर तुम्ही अजूनही फार्मर आयडी बनवला नसेल किंवा ई-पीक पाहणी केली नसेल, तर ती कृषी सहाय्यकाच्या मदतीने पूर्ण करून घ्यावी.

दादांच्या विमानातून कोणाची उडी? प्रत्यक्षदर्शीचा खळबळजनक दावा, सरपंचांनी सगळं सांगितलं.Ajit Pawar Plane Crash In Baramati

माहिती गोळा करण्याची ही साखळी सोसायटीकडून जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे, तिथून अग्रणी बँकेकडे आणि शेवटी सहकार विभागाकडे पोहोचणार आहे. सर्व माहितीचे फिल्ट्रेशन आणि पडताळणी झाल्यानंतर, एप्रिल २०२६ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत कर्जमाफीसाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची अंतिम यादी निश्चित केली जाईल. गेली तीन महिने ही माहिती गोळा करण्याचे काम सुरू असून, ज्या जिल्ह्यांनी अद्याप डेटा पूर्ण केलेला नाही, त्यांना तातडीने काम संपवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या सोसायटीशी संपर्क साधून आपली माहिती अद्ययावत असल्याची खात्री करावी.

 महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment