February 2026 Holidays: फेब्रुवारी 2026 मध्ये शाळा-कॉलेज इतक्या दिवस बंद राहणार ? पाहा सण, जयंती आणि वीकेंड्ससह संपूर्ण सुट्ट्यांची यादी

February 2026 Holidays:फेब्रुवारीमध्ये येणाऱ्या सणांची आणि जयंतीच्या सुट्ट्यांची यादी 2026: फेब्रुवारी २०२६ मध्ये बोर्ड परीक्षांच्या काळात अनेक धार्मिक आणि राष्ट्रीय सणांमुळे विविध राज्यांमध्ये शाळा- कॉलेजाना सुट्टया असतील. चला तर मग जाणून घेऊयात सविस्तर यादी आजच्या खास लेखात

फेब्रुवारी महिना विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. याच महिन्यात देशातील अनेक भागांमध्ये बोर्डच्या परीक्षांना सुरुवात होते. शाळा आणि कॉलेजातील विद्यार्थी या काळात अभ्यास आणि परीक्षेच्या तयारीत पूर्णपणे गुंतलेले असतात. त्यामुळे फेब्रुवारीतील सुट्टया केवळ विश्रांतीसाठी नसून अभ्यास अधिक चांगला करण्याची संधीही असते.

मात्र, या महिन्यात काही राष्ट्रीय आणि सांस्कृतिक सण येतात, ज्यामुळे शाळा कॉलेज बंद राहतात. म्हणूनच विद्यार्थ्यांसह पालकांनाही फेब्रुवारी २०२६ मध्ये किती आणि कोणत्या दिवशी सुट्टया असतील, हे जाणून घेणे खूप महत्वाचं आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 

फेब्रुवारी २०२६ मध्ये अनेक धार्मिक आणि ऐतिहासिक प्रसंग आहेत. या निमित्ताने विविध राज्यांमध्ये सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या जातात. मात्र, सुट्ट्या या राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाच्या निर्णयावर अवलंबून असतात, त्यामुळे प्रत्येक राज्यात सुट्टी असेलच असे नाही.

याशिवाय, शनिवार रविवारच्या नेहमीच्या साप्ताहिक सुट्ट्याही विद्यार्थ्यांना मिळतात. बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवस असेही मिळतात, ज्या दिवशी परीक्षा नसतात आणि तयारीसाठी वेळ मिळतो.

1 फेब्रुवारी

फेब्रुवारी महिन्याची सुरुवात संत रविदासांची जयंतीने होते. संत रविदास जयंती १ फेब्रुवारी २०२६ रोजी साजरा होईल. विशेषतः उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये हा दिवस महत्वाचा मानला जातो. हरियाणा, पंजाब, चंदीगड, हिमाचल प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये या दिवशी सुट्टी दिली जाते.

मात्र, यंदा संत रविदास जयंती ही रविवार आहे. यामुळे अनेक शाळा-महाविद्यालयांचा सुट्टीचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना वेगळी अतिरिक्त सुट्टी मिळणार नाही.

15 फेब्रुवारी 2026

यानंतर फेब्रुवारीच्या मध्यात महाशिवरात्रीचा सण येतो. महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण असून तो देशभर श्रद्धा आणि भक्तीभावाने साजरा केला जातो. या दिवशी शिवमंदिरांमध्ये विशेष पूजा-अर्चा केली जाते. अनेक राज्यांमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी शाळा-महाविद्यालये आणि सरकारी कार्यालये बंद असतात.

फेब्रुवारी 2026 मध्ये महाशिवरात्री 15 फेब्रुवारी रोजी आहे. विशेष म्हणजे हा दिवसही रविवार आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी शाळांची नेहमीची साप्ताहिक सुट्टीच राहील. मात्र, काही राज्यांमध्ये आधीपासून घोषित सुट्टी असल्यामुळे अभ्यासाचे दडपण थोडे हलके राहू शकते.

आहाहा काय जबरदस्त नाचली राव ! विदेशी तरुणीचा साडी नेसून शरारत गाण्यावर खतरनाक डान्स; VIDEO होतोय तुफान व्हायरल. Russian girl dance viral video

या तारखांनाही सुट्टी असण्याची शक्यता

फेब्रुवारी महिन्यात आणखी एक महत्त्वाचा सण म्हणजे लोसर. हा सण विशेषतः सिक्कीम आणि काही डोंगराळ भागांमध्ये साजरा केला जातो. लोसर हा तिबेटी नववर्ष म्हणून ओळखला जातो आणि तेथील लोकांसाठी याचे विशेष महत्त्व आहे. 18 फेब्रुवारी 2026 ते २० फेब्रुवारी रोजी लोसर सण साजरा केला जातो. सिक्कीममध्ये या दिवशी शाळा-कॉलेज आणि सरकारी संस्था बंद राहू शकतात. मात्र, देशातील इतर भागांमध्ये या दिवशी नेहमीप्रमाणे कामकाज सुरू असते.

19 फेब्रुवारी

फेब्रुवारीतील आणखी एक महत्त्वाचा दिवस म्हणजे 19 फेब्रुवारी. या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज जयंती महाराष्ट्रात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी संपूर्ण राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. महाराष्ट्रातील शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालये बंद राहतात.

विद्यार्थ्यांसाठी हा दिवस खास असतो, कारण अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि समारंभ आयोजित केले जातात. महाराष्ट्राबाहेर या दिवशी सहसा सुट्टी नसते, मात्र काही शैक्षणिक संस्था आपल्या पातळीवर सुट्टी देऊ शकतात. या सणांव्यतिरिक्त, फेब्रुवारी महिन्यातील नियमित शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्याही विद्यार्थ्यांना मिळणार आहेत.

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment