Girl Dance Viral Video: काही महिन्यांपासून सोशल मीडियावर ‘एक नंबर तुझी कंबर’, ‘कतल’, ‘बंबई की रानू’ अशी अनेक भारतीय गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. या गाण्यांवर अनेकांनी रील्स बनवल्या असून, सोशल मीडियावर अनेकांना या गाण्यांचे वेड लागले आहे.
तसेच अनेकदा सोशल मीडियावर काही जुनी गाणीदेखील खूप चर्चेत येतात. दरम्यान, सध्या ‘उई अम्मा’ हे गाणंही खूप चर्चेत आहे, ज्यावर सोशल मीडियावरील अनेक जण रील्स बनविताना दिसत आहेत. आता असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक कॉलेजमधील विद्यार्थीनी नाचताना दिसतेय.
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सोशल मीडियावर अनेक चांगल्या-वाईट घटनांचे व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात. हल्ली अनेक युजर्स सोशल मीडियावर उत्तम दर्जाचे कंटेंट शेअर करतात. त्यात ज्यात सुंदर डान्स, संगीत, रेसिपी, लेखन अशा विविध गोष्टी आपल्याला पाहायला किंवा वाचायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीही कौतुक कराल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक कॉलेजमधील विद्यार्थीनी भरवर्गात ‘उई अम्मा’ गाण्यावर डान्स करताना दिसतेय. यावेळी तिच्या डान्स स्टेप्स भन्नाट आहेत. तिचा डान्स पाहून तिच्चा समोर असलेले तिचे वर्गमित्रही तिला दाद देत आहे. सध्या तिचा हा डान्स खूप व्हायरल होतोय.
या व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @kavitha_ideal या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत जवळपास ४५ मिलियनहून अधिक आणि लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.
त्यातील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “अरे व्वा किती छान नाचली” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “याला म्हणतात डान्स”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “डान्स असावा तर असा”