३१ डिसेंबरपर्यंत ‘एचएसआरपी’ बसवा, अन्यथा होणार कारवाई आतापर्यंत पाच वेळा मुदतवाढ : मालेगाव उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे विशेष मोहीम HSRP Number Plate New Last Date

HSRP Number Plate New Last Date:१ एप्रिल २०१९ पूर्वी उत्पादित सर्व वाहनांना नवीन हायसिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी आतापर्यंत पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली. विभागाने ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. या पार्श्वभूमीवर मालेगाव उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे मोहीम राबविण्यात येत आहे.

मालेगाव आरटीओच्या कार्यक्षेत्रात मालेगाव, सटाणा, देवळा, कळवण आणि नांदगाव हे पाच तालुके येतात. नवीन नंबर प्लेटसाठी पोर्टलवर ८४ हजार ६१९ वाहनांची नोंद आहे. त्यापैकी ७४ हजार ९०७ वाहनांवर उच्च दर्जाच्या नंबर प्लेट बसविण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुढील २१ दिवसात उर्वरित ९ हजार ७१२ वाहनांना नव्या नंबर प्लेट बसवणे शक्य होणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, आता दिलेली ३१ डिसेंबर ही मुदत अंतिम असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ठ केले आहे.

रेशन धान्य वितरणाच्या नियमांत बदल, 1 जानेवारी 2026 पासून कुणाला किती लाभ मिळणार ? Ration Distributor New Rule 2026

डिसेंबर

२०२५ ही मुदत अंतिम असून, यानंतर एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असे परिवहन विभागाने स्पष्ट केले असून, वेळेत वाहनांच्या नंबर प्लेट बदलण्याचे आवाहन केले आहे.

तांत्रिक अडचणींचा खोडा

ऑनलाइन बुकिंग आणि पेमेंटसाठी वापरल्या जाणाऱ्या वेबसाइटची गती मंद आहे

याशिवाय वाहनधारकांनी बुकिंग केल्यावर फिटमंटसाठी दूरच्या तारखा दिल्या जात आहेत, तसेच दिलेल्या वेळेत हजर झाले तरी अनेकदा नंबर प्लेट बुकिंग सेंटरवर आली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

लाडक्या बहिणींना e-KYC केली तरीही ₹१५०० कायमचे बंद होणार, नेमकं कारण काय ? समोर आली अपडेट.Ladki Bahin Yojana EKYC List

वाहनधारकांना आवाहन करीत आहोत की, ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत आहे. यानंतर कोणतीही सवलत दिली जाणार नाही. एचएसआरपीमुळे वाहनांची चोरी रोखण्यास आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना शोधण्यास मदत होते. नागरिकांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करावी; अन्यथा वायुवेग पथकाकडून दंडात्मक कारवाई केली जाईल. विनोद जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

…तर भरावा लागेल दंड

एचएसआरपी नसल्यास काय होणार कारवाई? ३१ डिसेंबरनंतर एचएसआरपी नसलेल्या वाहनधारकांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. पहिल्यांदा नियमांचे उल्लंघन झाल्यास ५,५०० रुपये दंड आकारला जाऊ शकतो. वारंवार नियम मोडल्यास १० हजारापर्यंत दंड किंवा वाहन जप्तीची कारवाई होईल. एचएसआरपीमुळे वाहनांची सुरक्षा वाढते, चोरीच्या घटनांमध्ये घट होते, गुन्हेगारीसाठी वापरल्यास ट्रॅक करणे सोपे होते.

या टप्पांत झाली मुदतवाढ

मुदतवाढ

कालावधी

मूळ अंतिम मुदत

३१ मार्च २०२५

पहिली मुदतवाढ

३० एप्रिल २०२५

दुसरी मुदतवाढ

३० जून २०२५

तिसरी मुदतवाढ

१५ ऑगस्ट २०२५

चौथी मुदतवाढ

३० नोव्हेंबर २०२५

पाचवी मुदतवाढ

३१ डिसेंबर २०२५

महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment