Indian Viral Forner Viral Video:देशातील विविध राज्यात महिला सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. महिला सुरक्षेकरता सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असली तरीही मोठ्या शहरातील लहान गल्ल्यांमध्येही महिलांवरील अत्याचार थांबलेले नाहीत. वर्षानुवर्षे मुलींवरच्या अत्याचारांची संख्या वाढतच चाललीय.
सोशल मीडियावर, वृत्तपत्रांमध्ये, बातम्यांद्वारे आपल्याला या सगळ्याची माहिती मिळते आणि माणूस म्हणून आपण कुठेतरी चुकतोय याची खंत वाटते. आजही जगभरात अनेक देशांत महिला असुरक्षित आहेत.
अत्याचार करणारी विकृत माणसं दिवसाढवळ्या खुली फिरतायत. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर येत आहे. भर रस्त्यात विदेशी तरुणीसोबत केलेल्या धक्कादायक कृत्यामुळे सर्वच संतापले आहेत. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
झालं असं की, श्रीलंकेत एकट्या राहणाऱ्या विदेशी महिलेसोबत घडलेल्या या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. ही महिला न्यूझीलंडची रहिवासी आहे. ती श्रीलंकेतमध्ये पर्यटनासाठी आलाी होती. यावेळी तिने भाड्याने टुक-टुक घेऊन त्यातून प्रवास केला. यावेळी तिला एक त्रासदायक अनुभव आला. या घटनेमुळे जागतिक स्तरावर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, विदेशी महिला टुक-टुक मधून फिरडत आहे. यावेळी एका ठिकाणी ती काही काळासाठी थांबते. तेव्हा एक तरुण स्कूटरवर तिच्याजवळ येतो आणि तिच्याशी बोलू लागतो.
महिलेला देखील सुरुवातीला काही चुकीचे वाटत नाही यामुळे ती त्याच्याशी गप्पा मारु लागते. पण अचान तरुण असे काही करतो की महिलेला अस्वस्थ वाटू लागते. पुरुष तिच्याकडे लैंगिक संबंध ठेवण्यासाठी बोलतो. धक्कादायक म्हणजे तरुण पॅन्ट काढून तिच्यासमोर अश्लील वर्तनही करोत. यामुळे घाबरलेली महिला तिथून निघून जाते.
पाहा व्हिडीओ