लाडकी बहीण E केवायसी झालेल्या महिलांना 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात! शासन निर्णय जारी Ladki Bahin Yojana Insttalment

Ladki Bahin Yojana Insttalment:मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी” सन २०२५-२६ या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करणेबाबत. (लेखाशिर्ष २२३५डी७६७)महाराष्ट्र शासन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात मागणी क्र.एन-३, २२३५-सामाजिक सुरक्षा व कल्याण, ०२ समाजकल्याण, ७८९ अनुसूचित जातींसाठी विशेष घटक योजना, (०२) अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत योजना, (०२) (०१) मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना (कार्यक्रम) ३१-सहायक अनुदाने (वेतनेतर) (२२३५डी७६७) या लेखाशिर्षाखाली रु.३९६०.०० कोटी इतका नियतव्यय मंजूर आहे.

०२. वित्त विभागाच्या संदर्भाधीन दि.०७.०४.२०२५ रोजीच्या परिपत्रकान्वये सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर, २०२५ या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी (२२३५डी७६७) या लेखाशिर्षाखाली ३१- सहाय्यक अनुदाने (वेतनेतर) या उद्दीष्टाखाली रु.२६३.४५ कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव, महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पिय निधी वितरण प्रणालीवर वितरीत करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

एकनाथ शिंदेंना मोठा राजकीय धक्का! हे 22 आमदार भाजपच्या गळाला?Shivsena MLA Join BJP Update

०३. सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात आला आहे. सदर वितरीत निधी खर्च करतांना नियंत्रक अधिकारी यांनी विहित पध्दतीने काटकसरीच्या उपाययोजना करुन खर्च करावा. सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरुन मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी. तसेच उपलब्ध करुन दिलेल्या तरतूदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल, लेखाशिर्षनिहाय / उपलेखाशिर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती, निधी उपयोगिता प्रमाणपत्र, संबंधित क्षेत्रिय अधिकारी यांनी आयुक्त, समाजकल्याण, संबंधित प्रादेशिक उप आयुक्त, समाजकल्याण, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच महिला व बाल विकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत पाठवणेबाबत दक्षता घ्यावी.

घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होणार! ‘या’ लोकांना सरकार HBA योजनेअंतर्गत 25 लाखापर्यंतचे कर्ज देणार..Central Government Employees Home Loan

०४. विभागाने अनुसूचित जातीच्या व नवबौध्द प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या उपलब्ध करुन देण्यात यावी. तसेच अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या निधीचा विनियोग अनुसूचित जातीच्या व नवबौध्द प्रवर्गातील लाभार्थीकरिताच होईल याबाबत विभागाने दक्षता घ्यावी.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” या योजनेव्दारे दुस-यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही याबाबत महिला व बाल विकास विभागाने दक्षता घ्यावी.

Leave a Comment