सातबारा उताऱ्यातील फेरफारच्या नोटिसा आता घरपोच मिळणार; भूमी अभिलेख विभागाचा ‘हा’ नवीन मोठा निर्णय Land Record satbara ferfar

Land Record satbara ferfar ऑफलाइन प्रकारात अनेकदा तलाठी आणि पक्षकारांकडून नोटीस बजावणे आणि त्या न मिळणे अशा स्वरुपाच्या तक्रारी येत होत्या. त्यावर भूमी अभिलेख विभागाने हा उपाय काढला आहे.

सातबारा उताऱ्यातील फेरफारच्या नोटिसा, न्यायालयीन प्रकरणांमधील नोटिसा; तसेच महाराष्ट्र महसूल संहितेतील अपिलांमधील नोटिसा आता तलाठ्यांकडून पोस्ट ऑफीसमध्ये ऑनलाइन देण्यात येणार आहेत.

पोस्ट ऑफीसमधून या नोटिसा थेट पक्षकारांना बजावल्या जाणार आहेत. त्यामुळे तलाठ्यांचे काम सुकर होऊन पक्षकारांनाही या नोटिसा बजावल्या जाणार, याची खात्री करता येणार आहे.

लाडकी बहीण योजना e-KYC लाभार्थी यादी जाहीर! नाव कसे तपासावे येथे पहा Ladki Bahin Yojana E-KYC List

ऑफलाइन प्रकारात अनेकदा तलाठी आणि पक्षकारांकडून नोटीस बजावणे आणि त्या न मिळणे अशा स्वरुपाच्या तक्रारी येत होत्या. त्यावर भूमी अभिलेख विभागाने हा उपाय काढला आहे.

पुढील दोन महिन्यांत राज्यभरात हा उपक्रम सर्वच गावांमध्ये सुरू करण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. गावपातळीवर महसूल विभागामार्फत तलाठी हे नागिरकांना वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये नोटिसा काढतात.

त्यात खरेदी विक्री झाल्यानंतर संबंधितांना त्यांच्याशी संबंधित असणाऱ्यांना नोटिसा बजावल्या जातात. वारस नोंदी घेताना देखील अशा संबंधितांना नोटिसा स्वरुपाच्या बजावल्या जातात.

उड्डाणापूर्वीचा अजितदादांचा व्हिडिओ व्हायरल, नेमकं काय आहे व्हिडिओत? Ajit dada Pawar Death Viral Video

अनेकदा संबंधित पक्षकारांना नोटीस बजावूनही त्या मिळत नाहीत. यामुळे आता तलाठ्याकडे आलेली नोटीस ऑनलाइन पद्धतीने पोस्ट ऑफिसमध्ये दिली जाणार आहे.

पोस्ट ऑफीस ही नोटीस प्रिंट करून ती संबंधित पक्षकाराला रजिस्टर पोस्टाने पाठविणार आहे. संबंधित पक्षकाराला नोटीस बजावण्यात आल्याचे नोटिफिकेशन तलाठ्याकडे जाणार आहे.

नोटीस मिळाल्यानंतर त्याची पोच ही ऑनलाइन तलाठ्याला मिळणार आहे. त्यामुळे आता तलाठ्याला ऑफलाइन पद्धतीने नोटिसा बजावण्याची गरज भासणार नाही. तसेच यासंदर्भात दोन्ही बाजूंकडून येणाऱ्या तक्रारी येणार नाहीत.

या नोटिसा तलाठ्यांकडे आल्यानंतर त्यात पोस्ट ऑफीसकडे पाठवण्यात येणार आहेत. पोस्टाकडे आलेल्या नोटीस प्रिंट करून त्यावर योग्य ते तिकीट लावून पक्षकाराकडे त्या पोस्टमन पोहोच करतील.

त्याचे रेकॉर्ड ठेवले जाणार असून, ते तलाठी पाहू शकणार आहे. या सर्व नोटिसांचे ट्रॅक रेकॉर्ड जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्व अधिकाऱ्यांना पाहता येणार आहे. – विकास गजरे, संचालक आयटी, भूमी अभिलेख विभाग, पुणे

महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment