Maharashtra Weather Update : पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा हायअलर्ट

Maharashtra Weather Update:सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्याचा थेट परिणाम महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर होत आहे. त्यामुळे राज्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाची हजेरी लागत आहे. पुढील दोन-तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

पावसाचा अंदाज

हवामान खात्याच्या माहितीनुसार महाराष्ट्रात पुढील दोन दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषतः कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा धोका असल्याने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. मराठवाड्यातील बहुतांश भागातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.

महाराष्ट्र शासनाचा निर्णय : ५ सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, परिपत्रक जारी.School Holiday 2025

विविध जिल्ह्यांमध्ये अलर्ट

मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार तसेच पुणे घाटमाथा या भागांसाठी ऑरेंज अलर्ट आहे.

कोल्हापूर, सातारा घाटमाथा या भागांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर आणि पुणे येथेही येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

राज्यातील ज्येष्ठ नागरिक , विधवा , दिव्यांगांना दरमहा 2500/- रुपये अर्थसहाय्य ; मंत्रीमंडळ निर्णय दि.03.09.2025 Financial assistance grant

तारीखवार अंदाज

5 सप्टेंबर : रायगड, ठाणे, पालघर, नाशिक व पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट; तर मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा घाटमाथा आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट.

6 सप्टेंबर : पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट; रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, नाशिक घाटमाथा तसेच पालघर, नंदुरबार येथे येलो अलर्ट. उर्वरित राज्यात पावसाचा जोर कमी होणार.

7 सप्टेंबर : नाशिक व पुणे घाटमाथ्यावर येलो अलर्ट; रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम.

मागील 24 तासांचा हवामान आढावा

बुधवारी सकाळपर्यंत कोकण व घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळला. राज्यातील इतर भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या. मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरण राहून ऊन-सावलीचा खेळ दिसून आला, तसेच हलक्या सरींचाही अनुभव आला.

धरणांमधील पाणीसाठा

गेल्या काही दिवसातील दमदार पावसामुळे राज्यातील धरणे जलसंपन्न झाली आहेत.

मोठ्या प्रकल्पांमधील पाणीसाठा 93.12% वर गेला आहे.

मध्यम प्रकल्पांमध्ये 77.83% पाणीसाठा आहे.

लघु धरणांमध्ये 57.18% जलसाठा नोंदवला गेला आहे.

मराठवाड्यातील लघु, मध्यम आणि मोठी धरणे जवळपास भरून आली आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये 81.10% पाणीसाठा झाल्याची नोंद आहे.

महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment