जिल्हा परिषद निवडणुकांची पुढील आठवड्यांत घोषणा होणार! तयारीला लागा Maharashtra ZP Election 2025

Maharashtra ZP Election 2025:नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखा येत्या दोन आठवड्यांत जाहीर होतील, तशी तयारी सुरू असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिली आहे.

एक निवडणूक संपताच दुसऱ्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला तर आचारसंहितेचा कालावधी वाढू शकतो. त्याचा परिणाम विकासकामांवर होऊ शकतो, हे लक्षात घेऊन आयोगाने तयारी सुरू केलेली आहे.

महानगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने १७ प्रवक्त्यांची यादी जाहीर New list of Nationalist Congress Party spokespersons

महापालिका निवडणुकाही २० जानेवारीपूर्वी उरकणार

नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर केलेल्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत पार पडत आहेत. तसेच, आता जिल्हा परिषदांच्या निवडणुकाही जाहीर केल्यानंतर साधारणतः ३० दिवसांच्या कालावधीत पार पाडल्या जाण्याची शक्यता आहे.

राज्यातील गुंठेवारीला अधिकृत परवानगी, राज्यपालांचा अध्यादेश Maharashtra Government Land Record News

२ नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात या निवडणुका जाहीर होऊन डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात त्या संपवल्या जाण्याची शक्यता आहे. महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात होऊन जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात निवडणूक पार पडण्याची शक्यता आहे.

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment