रासायनिक खतांच्या दरात पुन्हा वाढ! शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे २०० ते २५० रुपये अधिक मोजावे लागणार New rates of chemical fertilizers

New rates of chemical fertilizers:गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खतांच्या किमतीत सतत वाढ होत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. यावर्षीही मोठी भाववाढ झाल्याने पुन्हा चिंतेत भर पडली आहे. आगामी रब्बी हंगामात नियोजन करताना शेतकऱ्यांना नाकीनऊ येत आहे. ताळमेळ जुळत नसल्याची शेतकऱ्यांनी व्यथा मांडली. अलीकडच्या काळात उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांसाठी रासायनिक खते महत्त्वाचा भाग बनला आहे.

ही गरज लक्षात घेता शासनाकडून रासायनिक खतांचे भाव गेल्या अनेक वर्षांपासून सतत वाढताना दिसत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. दुसरीकडे उत्पादन खर्चानुसार भाव मिळत नसल्याने संपूर्ण अर्थचक्रच शेतकऱ्यांचे कोलमडले आहे.

हंगामापूर्वीच खतांच्या किमती वाढल्याने गोणीमागे २००-२५० रुपयांची वाढ झाली आहे. सुरू होत असलेल्या ख्बी हंगामात खताच्या

६६

 

गेल्या काही वर्षापासून सोयाबीन, कांद्यासह अन्य शेतमालाचे – भाव सातत्याने घसरत आहे. त्यामुळे आता नेमके पिकवावं काय, हा यक्षप्रश्न आज शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे आणि रासायनिक खतांचे भाव दिवसेंदिवस वाढतच असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

सुनील गवळी, शेतकरी, ब्राह्मणगाव नजीक

किमती अस्मानाला भिडल्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसणार असून, उत्पादन खर्चात भर पडणार आहे.

एकीकडे शेतीमालाला भाव मिळत नसताना खते व कीटकनाशकांच्या किमती दरवर्षी वाढत असल्याने शेतकरी मेटाकुटी आले आहेत. खतांच्या जुन्या व नवीन दरांमध्ये मोठी तफावत असून, शेतकऱ्यांना २०० ते २५० रुपये अधिकचे मोजावे लागत आहेत. उन्हाळी कांदा व इतर पिकासाठी लागणारा रासायनिक खतांचा डोसदेखील आवश्यकच असतो.

त्यामुळे शेतकरी सध्या खत खरेदी करण्यासाठी दुकानात जात आहेत. तेव्हा खतांच्या किमती वाढल्याचे विक्रेते सांगत आहेत. निफाड तालुक्यातील शेतकरी कांदा पिकाला जास्त प्राधान्य देतात.

सध्या कांद्यासाठी एकरी चार बंग रासायनिक खत लागत असून, खतांच्या किमतीमध्ये प्रतिगोणी २०० ते २५० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे. एकीकडे शेतमालास भाव मिळत नसताना खते व कीटकनाशकांच्या किमती वाढत असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

-बबनराव शिंदे,

Leave a Comment