Petrol Diesel Price Today:निर्मला सीतारमण यांनी बजेट सादर केल्यानंतर पेट्रोल डिझेलच्या किमती शहरानुसार वेगळ्या आहेत, मुंबईत सर्वाधिक दर असून दोन वर्षांपासून दरात स्थिरता आहे.
रविवार १ फेब्रुवारी 2026 असूनही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेट मांडलं. त्यानंतर शेअर मार्केटमध्ये मोठा भूकंप आला होता. सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आज आठवड्याच्या सुरुवातीला पेट्रोल डिझेलच्या किंमती जाहीर झाल्या आहेत. सर्वसामान्यांच्या दैनंदिन बजेटमध्ये इंधनाचा वाटा मोठा असतो.
ऑफिसला जाणारा नोकरदार असो वा भाजीपाला वाहतूक करणारा छोटा व्यापारी, पेट्रोल-डिझेलच्या किमती सर्वांच्याच आयुष्यावर परिणाम करतात. आज, २ फेब्रुवारी रोजी प्रमुख शहरांमधील दर स्थिर असले तरी, राज्याराज्यांमधील टॅक्सच्या फरकामुळे किमतीत तफावत पाहायला मिळत आहे.
Urea Fertilizer : केंद्र सरकारने युरिया खतासंदर्भात घेतला मोठा निर्णय, अधिसूचना जारी, काय आहे निर्णय
दोन वर्षांपासून किमतीत स्थिरता का?
मे २०२२ मध्ये केंद्र सरकारने अबकारी करात (Excise Duty) कपात केल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घसरण झाली होती. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल कितीही महाग किंवा स्वस्त झाले, तरी भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी दर मोठ्या प्रमाणावर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न तेल कंपन्यांनी केला आहे. मात्र, राज्यांचा व्हॅट (VAT) वेगवेगळा असल्याने मुंबई आणि दिल्लीच्या दरात १० ते १२ रुपयांची तफावत दिसते.

इंधनाचे दर कसे ठरतात?
१. कच्च्या तेलाच्या किमती: जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले की भारतात इंधन महागते. २. रुपयाचे
मूल्य: आपण तेल डॉलरमध्ये खरेदी करतो, त्यामुळे रुपया कमकुवत झाला की इंधन दरांवर ताण येतो. ३. सरकारी
टॅक्स: पेट्रोलच्या मूळ किमतीवर केंद्र आणि राज्य सरकारचे कर लागल्यानंतरच ते ग्राहकांपर्यंत पोहोचते.
घरी बसून दर कसे तपासाल ?
जर तुम्हाला तुमच्या शहरातील दर एसएमएसद्वारे जाणून घ्यायचे असतील, तर खालील नंबरवर मेसेज कराः
Indian Oil: RSP <शहर कोड> लिहून ९२२४९९२२४९ वर पाठवा.
BPCL: RSP लिहून ९२२३११२२२२ वर पाठवा.
HPCL: HP Price लिहून ९२२२२०११२२ वर पाठवा
महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा