फक्त ४०० रुपये रोज वाचवा अन् मुलीच्या भविष्यासाठी ७० लाख मिळवा; पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना ठरेल फायदेशीर.Post Office Scheme

Post Office Scheme :पोस्ट ऑफिसच्या लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळत नाही, असा अनेकांचा समज आहे. मात्र, जर योग्य नियोजन करून गुंतवणूक केली, तर या योजनांमध्येही जोखीममुक्त आणि चांगला परतावा मिळवता येतो. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका अशाच योजनेबद्दल सांगणार आहोत, जी तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबाला भविष्यात एक मोठी रक्कम मिळवून देऊ शकते.

सातबाऱ्यावरील इतर हक्कातील व्यक्तींना मिळकतीत हिस्सा मिळतो का? जाणून घ्या सविस्तर. Land Record satabara itar hakka

या योजनेचे नाव सुकन्या समृद्धी योजना आहे. या योजनेत सध्या ८.२ टक्के व्याज दिले जात असून ही योजना पूर्णपणे करमुक्त आहे.

दरवर्षी किती रक्कम जमा करता येते?ही योजना तुम्ही तुमच्या १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीच्या नावाने उघडू शकता, ज्यामुळे तिच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतच्या खर्चाची सोय होऊ शकते. सुकन्या समृद्धी योजनेत तुम्ही वर्षाला किमान २५० रुपये पासून ते कमाल १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता.

घरातील झुरळं – पाली – उंदीर जातील पळून, करा असा सोपा घरगुती उपाय – करा कायमचा बंदोबस्त… Kitchen Desi Jugad Video

एका कुटुंबातील जास्तीत जास्त २ मुलींसाठी हे खाते उघडता येते. मात्र, जर जुळ्या मुली असतील तर तीन मुलींसाठी खाते उघडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. खाते उघडल्यापासून पुढील १५ वर्षांपर्यंत यात पैसे जमा करता येतात. जर एखाद्या आर्थिक वर्षात खात्यात किमान २५० रुपये जमा केले नाहीत, तर ते खाते ‘डिफॉल्ट’ होईल. मात्र, पुढील १५ वर्षांच्या आत दंड भरून ते पुन्हा सुरू करता येते.

पैसे कधी काढता येतात? आणि मुदतपूर्ती कधी होते?मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत तिचे पालक हे खाते चालवू शकतात. पण, मुलगी १८ वर्षांची झाल्यावर किंवा १० वी उत्तीर्ण झाल्यावर या खात्यातून काही प्रमाणात पैसे काढता येतात. मुदतपूर्तीपूर्वी एकरकमी पैसे काढण्याची परवानगी नाही, मात्र वर्षातून एकदा हप्त्यांमध्ये पैसे काढता येतात.

हे खाते उघडल्याच्या तारखेपासून २१ वर्षांनी त्याची मुदतपूर्ती होते, पण तुम्हाला फक्त १५ वर्षांपर्यंतच पैसे जमा करायचे आहेत. याशिवाय, मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यावर तिच्या लग्नाच्या वेळीही या खात्याची मुदतपूर्ती करता येते.

मृत्युपत्राने मिळवलेली स्वकष्टार्जित मालमत्तेचा भविष्यात कायदेशीर दर्जा काय? कोणाला मिळते संपत्ती ? जाणून घ्या वारसांचे हक्क Property Inheritance Rule

४०० रुपयांपासून ७० लाखांपर्यंतचा प्रवासजर तुम्हाला तुमच्या मुलीसाठी या योजनेतून मुदतपूर्तीनंतर सुमारे ७० लाख रुपये मिळवायचे असतील, तर तुम्हाला दररोज सुमारे ४०० रुपयांची बचत करावी लागेल. अशाप्रकारे, तुम्ही दर महिन्याला १२,५०० रुपये आणि वर्षाला १.५ लाख रुपये जमा कराल..

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment