Registration and Stamp Duty Department Recruitment 2025:नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाच्या सुधारित आकृतिबंधास मान्यता देण्यात आली आहे.
महसूल आणि वन विभागाने त्या संदर्भातील शासन निर्णय जाहीर केला आहे. सुधारित आकृतिबंधानुसार सद्यःस्थितीत मंजूर पदांची संख्या ३,९५२ झालेली आहे.
राज्याचे मुख्य सचिव आणि अपर मुख्य सचिव (महसूल, मुद्रांक शुल्क आणि नोंदणी) यांच्या प्रयत्नाने सध्या मंजूर ३०८४ पदांपैकी १०७ पदे निरसित करण्यात आली आहेत.
तसेच,त्यामध्ये ९६५ पदे नव्याने निर्माण करुन ३,९५२ पदांचा सुधारित आकृतीबंध तयार करण्यात आला होता. त्याला महसूल आणि वन विभागाने मान्यता दिली असून, त्याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांनी दिली आहे.
नवीन आकृतीबंधाची मागणी २०१६ पासून प्रलंबित होती. नवीन दुय्यम निबंधक कार्यालयांच्या निर्मिती, दस्त संख्येत वाढ, तसेच इतर कामकाजामध्ये झालेली व्यापक वाढ लक्षात घेता, या निर्णयामुळे विभाग अधिक सक्षम आणि बळकट होईल, असा दावा बिनवडे यांनी केला.
महत्वाची बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा