सुधारित आश्वासित प्रगती योजनेचे 7 वा वेतन आयोगानुसार 03 सेवांतर्गत प्रगती योजनेचे लाभ GR .Revised Assured Progress Scheme

Revised Assured Progress Scheme:राज्य शासनाने चौथ्या, पाचव्या व सहाव्या वेतन आयोगामध्ये राज्य शासकीय तसेच जिल्हा परिषदेचे शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकरिता यथास्थिती कालबद्ध पदोन्नती योजना, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना तसेच सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू केल्या होत्या. कालबद्ध पदोन्नती योजना व सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना, ह्या दोन योजना, संपूर्ण सेवा कालावधीमध्ये एक लाभाच्या योजना होत्या. तर सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना ही संपूर्ण सेवा कालावधीत दोन लामाची योजना होती. ज्या कर्मचाऱ्यांनी कालबद्ध पदोन्नतीचा लाभ घेतला आहे, त्यास सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ अनुज्ञेय नव्हता. तसेच सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या प्रयोजनासाठी ज्या कर्मचाऱ्यांनी अगोदरच्या वर नमूद दोन योजनांपैकी एका योजनेचा लाभ घेतला होता, त्यांचा सदर एक लाभहा सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या दोन लाभांपैकी एक लाभ ठरत होता. वर नमूद तीनही योजनेअंतर्गत अनुज्ञेय केलेला पहिला लाभ हा, संबंधितास त्यांच्या मूळ नियुक्तीपासून १२ वर्षाच्या नियमित सेवा पूर्ण केल्यानंतर, पात्रतेनुसार अनुज्ञेय करण्यात आला होता. तर सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत दुसरा लाभ हा पहिल्या लाभाच्या प्राप्तीच्या तारखेपासून १२ वर्षाच्या सेवेनंतर, पात्रतेनुसार अनुज्ञेय करण्यात आला होता.

२. सातव्या केंद्रीय वेतन आयोगाचा शिफारस अहवाल विचारात घेऊन, केंद्र शासनाने सुधारीत वेतनश्रेणी, तीन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना तसेच अन्य सेवाविषयक लाभ केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांना यापूर्वीच लागू केलेले आहेत. केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांना, केंद्र शासनाने लागू केलेल्या सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या स्वरुपामध्ये उचित फेरफार करुन राज्य शासकीय कर्मचारी, जिल्हा परिषद शिक्षकेतर कर्मचारी व अन्य शिक्षकेतर कर्मचारी यांना त्यांच्या १०, २० व ३० वर्षांच्या सेवेनंतर तीन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याची शिफारस व अनुषंगिक शिफारशी, श्री. के. पी. बक्षी, अध्यक्ष, राज्य वेतन सुधारणा समिती, २०१७ यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीने, राज्य शासनास केल्या होत्या. सदर शिफारशी मध्ये, किंचित फेरफार करुन सदर शिफारशी स्वीकारण्याबाबतचा निर्णय, राज्य मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्या अनुषंगाने, १०, २० व ३० वर्षांनतर पात्रतेनुसार अनुज्ञेय करणारी, तीन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याची शिफारस, स्वीकृत, करण्याबाबतचा शासन निर्णय, वित्त विभाग दि.०१.०१.२०१९ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, पूर्वीच्या अनुज्ञेय योजनेनुसार १२ / २४ वर्षांनंतर (दि.३१.१२.२०१५ पर्यंत तसेच दि.०१.०१.२०१६ ते दि.३१.१२.२०१८ पर्यंतच्या कालावधीत), ज्या कर्मचारी अधिकारी यांनी यथास्थिती पहिला व दुसरा लाभ घेतला आहे, त्यांना तसेच दि.०१.०१.२०१९ नंतर शासन सेवेत सरळसेवा भरतीने नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना १० / २०/३० वर्षांनतर अनुज्ञेय ठरणारी तीन लाभाची सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना, कशाप्रकारे अनुज्ञेय करता येईल, याबाबत, पुढीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

शासन निर्णय –

सातव्या वेतन आयोगाच्या कार्यकाळामध्ये, १०, २० व ३० वर्षांच्या नियमित सेवेनंतरची, तीन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना ही दि.०१.०१.२०१६ पासून पुढीलप्रमाणे अंमलात येईल.

योजनेचा तपशील

() सातव्या वेतन आयोगामध्ये तीन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना ही वेतन मॅट्रीक्समधील वेतनस्तर एस-२० पर्यंत वेतन घेणाऱ्या (सहाव्या वेतन आयोगातील पे बैंड रु.१५६००-३९१०० व ग्रेड पे रु.५४००/- या वेतन संरचनेशी समकक्ष) कर्मचारी / अधिकारी यांना लागू राहील. संबंधित कर्मचारी / अधिकारी हे कोणत्याही कारणामुळे वेतनस्तर एस-२१ मध्ये वेतन आहरीत करु लागतील, तेव्हा त्यांना उपरोक्त नवीन योजनेअंतर्गत लाभ अनुज्ञेय राहणार नाही.

6) या योजनेखाली पात्र कर्मचारी अधिकारी यांना संपूर्ण सेवा कालावधीत, पात्रतेनुसार तीन वेळा, या योजनेचा लाभ मंजूर करण्यात येईल. मात्र, ज्या कर्मचारी अधिकारी यांना दोन कार्यात्मक पदोन्नत्या मिळाल्या आहेत, त्यांना या योजनेखाली फक्त एकच लाभ अनुज्ञेय होईल. थोडक्यात संबंधित कर्मचारी /अधिकारी यांना एकाच पदोन्नती साखळीतील पदावर मिळून त्यांची एकूण नियमित व सलग सेवा ३० वर्ष असल्यास, या ३० वर्षाच्या कालावधीत झालेल्या कार्यात्मक पदोन्नती व लाभ यांची संख्या, किमान तीन असावी, त्याशिवाय ज्या कर्मचारी / अधिकारी यांना तीन कार्यात्मक पदोन्नत्या मिळाल्या आहेत, त्यांना या योजनेअंतर्गत एकही लाभ अनुज्ञेय ठरणार नाही.

回 या योजनेअंतर्गत एकाच पदोन्नती साखळीतील पदावर मिळून झालेल्या संपूर्ण सेवा कालावधीत, संबंधितास सुरुवातीस लाम मंजूर झाला असल्यास व तदनंतर लाभाच्या वेतनश्रेणीत त्याची कार्यात्मक पदोन्नती झाल्यास, पुन्हा वेतननिश्चीतीचा लाभ अनुज्ञेय नसल्याने, अशा पदोन्नतीची गणना एकूण तीन कार्यात्मक पदोन्नतीच्या संख्येमध्ये करण्यात येणार नाही.

(v) या तीन लाभाच्या योजनेच्या लाभार्थीस, पदोन्नतीच्या पदाकरीता विहीत केलेली अर्हता, ज्येष्ठता, पात्रता, अर्हता परीक्षा, विभागीय परीक्षा उत्तीर्ण असणे, गोपनीय अहवालाची प्रतवारी, विभागीय चौकशी व न्यायिक प्रकरण प्रलंबित नसणे (शासन निर्णय सा.प्र.वि. दि.१५.१२.२०१७ नुसार), यथास्थिती जातीवैधता प्रमाणपत्र उपलब्ध असणे, अशा पदोन्नतीच्या कार्यपद्धतीची, विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीत पूर्तता करणे आवश्यक आहे.

(v.) तीन लाभांच्या योजनेचा पहिला व दुसरा लाभ ज्या कर्मचारी/ अधिकारी यांनी यापूर्वी अनुज्ञेयतेनुसार यथास्थिती कालबद्ध पदोन्नती योजना अथवा सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना वा सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला वा दुसरा लाभ यापूर्वी घेतलेला आहे, त्यांचे सदर लाभ हे तीन लाभाच्या योजनेखालील प्रकरणपरत्वे पहिला वा दुसरा लाभ समजण्यात येतील.

(v) विवक्षित सेवा कालावधीनंतर (After specified number of years of service), संबंधित पदाच्या कर्तव्ये व जबाबदारीत वाढ न होता, अकार्यात्मक वा तत्सम उच्च वेतन संरचनेचा (Non-Functional Pay Structure) मंजूर करण्यात आलेला / येणारा, लाभ, हा या योजनेखालील पहिला लाम (First benefit of MACPS) समजण्यात येईल. उदा. मंत्रालय / विधानमंडळ सचिवालय कक्ष अधिकाऱ्यांना चार वर्षांच्या नियमित सेवेनंतर देण्यात येत असलेली अकार्यात्मक वेतनसंरचना.

ज्या कर्मचारी / अधिकारी यांना पहिला लाम म्हणून ज्या पदाची वेतनसंरचना मंजूर करण्यात आली आहे, त्या पदाला विवक्षित सेवा कालावधीनंतर, त्या पदाच्या कर्तव्ये व जबाबदाऱ्यांमध्ये वाढ न होता, अकार्यात्मक व तत्सम उच्च वेतनसंरचना मंजूर करण्यात येत असेल तर ती अकार्यात्मक वा तत्सम उच्च वेतन संरचना हा दुसरा लाभ (Second benefit of MACPS) म्हणून मंजूर करण्यात येईल.

(vi) पूर्वी १२ व २४ वर्षांच्या सेवेनंतर मिळणारे लाभ, सातव्या वेतन आयोगात १०, २० व ३० वर्षांच्या सेवेनंतर पात्रतेनुसार अनुज्ञेय केले आहेत. त्यामुळे ज्या कर्मचारी अधिकारी यांना दि.०१.०१.२०१६ पूर्वी अनुज्ञेयतेनुसार यथास्थिती Shlok वा दुसरा लाभ मंजूर झाला आहे, अशा कर्मचारी अधिकारी यांना उर्वरित यथास्थिती दुसरा व तिसरा लाभ पुढील तक्त्यात नमूद केल्यानुसार, पात्रतेनुसार, अनुज्ञेय राहील.

शासन निर्णय खाली दिलेल्या लिंक वर डाऊनलोड करा

https://drive.google.com/file/d/1hDJtLT4jj6oz8ETgOeB9d3uLLqZdd0_g/view?usp=drive_link

 

Leave a Comment