Road Accident Viral Video:आजच्या काळात सोशल मीडिया आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनलाय. मोबाईल हातात घेतला की, आपण रील्स, शॉर्टस् व व्हिडीओ बघण्यात हरवून जातो. काही व्हिडीओ पाहून हसू येतं, तर काही पाहून आश्चर्य वाटतं.
पण कधी कधी असेही व्हिडीओ समोर येतात की, जे पाहिल्यावर थक्क व्हायला होतं. “हा इतका गंभीर प्रकार कसा घडला?” असा विचार मनात येतो. सध्या असाच एक हादरवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.
व्हिडीओची सुरुवात एका साध्या रस्त्याने होते. कोणतीही मोठी गर्दी नसते. सगळं नेहमीसारखं वाटतं. रस्त्याच्या अगदी मधोमध एक MCD कर्मचारी खुर्ची टाकून बसलेला आहे. तो तिथेच बसून काहीतरी वसुली करीत असल्यासारखं वाटतं. त्याच्या मागे आणखी एक माणूस उभा असल्याचे दिसते.
सगळं नेहमीसारखं सुरू असताना अचानक एक भरधाव कार तिथे येते. कार थेट त्या खुर्चीवर बसलेल्या कर्मचाऱ्याला जोरात धडक देते. धक्का इतका भयानक असतो की, कर्मचारी काही फूट दूर जाऊन पडतो. कोणालाही धक्का बसेल इतकं ते दृश्य हादरवणारं आहे. व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांमध्ये आपापली मतं मांडायला सुरुवात केली.
पाहा व्हिडिओ
https://www.instagram.com/reel/DRWqaSeEl9B/?igsh=a3ZyMXZ3MmJxbzBj
काही जणांनी थेट त्या कर्मचाऱ्यालाच दोष दिला. “अरे बाबा, रस्त्याच्या मधोमध खुर्ची टाकून कोण बसतं?” असं म्हणत लोक संताप व्यक्त करीत आहेत. तर काहींनी गाडी चालवणाऱ्या चालकालाही दोषी ठरवलं. “एवढ्या वेगात गाडी का चालवली,” असा प्रश्नही अनेकांनी केला.
काही युजर्सनी मात्र दोघांबद्दलही दुःख व्यक्त केलं. “चूक कुणाचीही असो; पण असं दृश्य पाहून अंगावर काटा आला,” अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया व्हिडीओखाली आल्या आहेत. तर काही लोकांनी प्रशासनावर टीका करीत, “अशा ठिकाणी कर्मचाऱ्यांना बसण्याची परवानगीच कशी दिली?” असं अनेकांनी विचारलं. हा व्हिडीओ पाहून नेटकरी हादरले असून, रस्त्यावरच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
हा व्हिडीओ सगळ्यांनाच एक धक्का देऊन जातोय. अशा छोट्या वाटणाऱ्या, पण निष्काळजीपणे केलेल्या चुका कधीतरी फार मोठा धोका बनून समोर येऊ शकतात, हेच या दुर्घटनेतून दिसून येतं. कसलाही विचार न करता, केलेली चूक थेट जीवावर बेतू शकते, याची जाणीव करून देणारा हा व्हिडीओ आहे.
https://www.instagram.com/reel/DRWqaSeEl9B/?igsh=a3ZyMXZ3MmJxbzBj