Russian girl dance viral video: सोशल मीडियाच्या काळात रोज कितीतरी व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण त्यातले काही व्हिडीओ फक्त पाहून विसरले जात नाहीत, तर मनाला भिडतात. वेगवेगळ्या देशांतील लोक जेव्हा एकमेकांची कला, गाणी व परंपरा स्वीकारतात, तेव्हा त्यातून एक वेगळाच आनंद मिळतो. आज भारतीय सिनेमा, गाणी आणि डान्स केवळ भारतापुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर जगभर पोहोचले आहेत.
एखादा परदेशी कलाकार भारतीय गाण्यावर नाचताना किंवा भारतीय कपडे घालून दिसला की, लोकांची उत्सुकता आपोआप वाढते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडीओत भारतीय संस्कृती, आत्मविश्वास व कला यांचा सुंदर मेळ पाहायला मिळतो. त्यामुळेच हा व्हिडीओ पाहणाऱ्यांना लगेच आवडला आणि तो सर्वत्र शेअर केला जात आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये एक रशियन तरुणी पारंपरिक भारतीय साडी नेसून बॉलीवूडमधील लोकप्रिय गाणं शरारतवर डान्स करताना दिसते. तिच्या डान्सची खास गोष्ट म्हणजे तिचा देसी अंदाज आणि आत्मविश्वास. साडीतील तिची चाल, स्टेप्स, चेहऱ्यावरचे भाव आणि गाण्याच्या प्रत्येक बीटशी जुळणारं टायमिंग पाहून ती भारतीय आहे की परदेशी, असं क्षणभर वाटतं. तिनं केवळ नृत्याच्या हालचालींचीच नक्कल केली नाही, तर गाण्याची भावना समजून घेत ती सादर केली आहे.
डान्स करताना तिची सहजता आणि एक्स्प्रेशन्स इतके नैसर्गिक वाटतात की, अनेकांना ती भारतीय नृत्य खूप छान करते, असे वाटते. ज्या आत्मविश्वासानं साडी तिनं सांभाळली आहे. त्यामुळे तिचा संपूर्ण लूक अधिक आकर्षक झाला आहे. हा व्हिडीओ पाहून असं वाटतं की, भारतीय संस्कृतीशी तिचं नातं केवळ दाखवण्यापुरतं न राहून, तिनं ते मनापासून केलं आहे.
व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडू लागला. अनेक युजर्सनी तिच्या डान्सचं मनापासून कौतुक करीत तिला “देसी गर्ल”, असं म्हटलं आहे. काहींनी लिहिलं की, आजकाल अनेक प्रोफेशनल डान्सर्सही इतके प्रभावी एक्स्प्रेशन्स देऊ शकत नाहीत; तर काही युजर्सनी तिला भारतात येऊन बॉलीवूडमध्ये काम करण्याचा सल्ला दिला.
साडीतील तिच्या लूकचीही मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. अनेकांनी असं मत व्यक्त केलं की, भारतीय पारंपरिक पोशाख कोणत्याही देशातील व्यक्तीवर तितकाच सुंदर दिसू शकतो. फक्त तो योग्य आत्मविश्वासानं परिधान केला पाहिजे. या रशियन तरुणीनं आपल्या टॅलेंट, मेहनत आणि भारतीय संस्कृतीप्रति असलेल्या आदरामुळे लोकांची मनं जिंकली आहेत. हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहिला जात असून, लोक तिच्या पुढील व्हिडीओची आतुरतेनं वाट पाहत आहेत.