School Holiday: आज शाळांना सुट्टी जाहीर, ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयं राहणार बंद

School Holiday: हवामान खात्याने पालघर जिल्ह्यात उद्या पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्ह्यातील अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे खबरदारी घेत जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांनी हा आदेश काढला आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयं उद्या म्हणजेच 26 जुलैला बंद राहणार आहेत.

पालघर जिल्ह्यात उद्या मुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघर जिल्ह्याला शुक्रवारी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. तसंच उद्या रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील काही भागात आज पावसाची संततधार सुरू आहे.

हवामान विभागाने (IMD) मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथे ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, ज्यामध्ये पुढे आणखी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसंच रायगड, रत्नागिरी येथेही रेड अलर्ट जारी केला आहे, शुक्रवारी काही ठिकाणी “मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस” आणि काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती.

MSRTC : मोठी बातमी, ‘लालपरी’चा प्रवास आता स्वस्त, ‘तो’ निर्णय मागे, शिंदेंची मोठी घोषणा काय?MSRTC Ticket Rate Down

सातारा आणि पुण्याच्या घाट भागातही रेड अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. रेड अलर्टचा अर्थ कारवाई करा असा होतो तर ऑरेंज आणि यलो अलर्टचा अर्थ “कारवाई करण्यास तयार रहा” आणि “सावध रहा” असा आहे. ऑरेंज अलर्ट म्हणजे “तयार रहा”, तर पिवळा अलर्ट म्हणजे “सावध रहा” असा इशारा आहे.

उल्हास नदीची पातळी वाढली

कर्जत परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. हवामान खात्याने रायगड जिल्हा रेड अलर्ट जारी केला आहे. रायगड जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे उल्हास नदी ही दुथडी भरून वाहत आहे. मात्र बदलापूर परिसरात पावसाचा जोर कमी असल्याने अजूनही बदलापूर शहरात कुठेही पाणी साचलेल्याच्या घटना समोर आल्या नाहीत, मात्र पालिका प्रशासनाने उल्हास नदीच्या किनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पोस्ट ऑफिसच्या या स्किममधून 5 वर्षात कमवा 7 लाख रुपये, कसं काय ते सर्व समजून घ्या Post Office Scheme

कोल्हापुरातील राधानगरी धरण 99 टक्के भरले

राधानगरी धरण 99 टक्के भरले असून कोणत्याही क्षणी स्वयंचलित दरवाजारून पाण्याचा विसर्ग सुरू होऊ शकतो. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढली.

आतापर्यंत जिल्ह्यातील सात धरणे 100% भरली आहेत. राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस राहिल्यास धरणाचे स्वयंचलित दरवाजे केव्हाही उघडले जातील. धरण 99% भरल्याने भोगावती पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने नदीकडच्या गावांना दिला सतर्कतेचा इशारा दिला आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment