School Holiday 2025:महाराष्ट्र शासनाने परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून वर्ष २०२५ साठी एकूण २४ सार्वजनिक सुट्ट्यांची यादी आधीच जाहीर केली आहे.
या यादीत ईद-ए-मिलाद सणाची सुट्टी शुक्रवार, ५ सप्टेंबर २०२५ रोजी दाखवली होती. हा मुस्लिमांचा महत्त्वाचा सण असून, यानिमित्ताने मिरवणुकीचे कार्यक्रम आयोजित होतात.
याच वेळी, शनिवार, ६ सप्टेंबर २०२५ रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदू सण आहे. दोन्ही समाजांमध्ये ऐक्य टिकून राहावे यासाठी २१ ऑगस्ट २०२५ रोजी मुस्लिम संघटनांची बैठक झाली. त्या बैठकीत मुस्लिम समाजाने ठरवले की मिरवणूक सोमवार, ८ सप्टेंबर २०२५ रोजी काढण्यात येईल.
त्यामुळे महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे की –
मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी आता शुक्रवार, ५ सप्टेंबर २०२५ ऐवजी सोमवार, ८ सप्टेंबर २०२५ असेल.
इतर सर्व जिल्ह्यांसाठी पूर्वी ठरल्याप्रमाणेच शुक्रवार, ५ सप्टेंबर २०२५ हाच दिवस सार्वजनिक सुट्टी राहील.
हा निर्णय महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार घेण्यात आला असून, अधिसूचना उप सचिव दिलीप देशपांडे यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आली आहे.